मोबाईल वॉलेट कंपन्यांना दिलासा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 27 February 2019

नवी दिल्ली - ग्राहकांची ई-केवायसी पूर्ण करण्यात अपयशी ठरलेल्या मोबाईल वॉलेट कंपन्यांना रिझर्व्ह बॅंकेने सोमवारी (ता.२५) मोठा दिलासा दिला. ई-केवायसी नियमांचे पालन करण्यासाठी या कंपन्यांना दिलेली मूदत आणखी सहा महिन्यांनी वाढविण्यात आल्याचे रिझर्व्ह बॅंकेने स्पष्ट केले आहे.

ग्राहकांच्या माहितीचा अद्ययावत तपशील ठेवण्यासंदर्भात (केवायसी) रिझर्व्ह बॅंकेने २०१७ मध्ये एक नियमावली जारी केली होती. त्याअंतर्गत ई-वॉलेट कंपन्यांना २८ फेब्रुवारीपर्यंत ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार होती.

मात्र आधारद्वारे ही प्रक्रिया पूर्ण करण्यात अडथळा आल्याने पर्यायी व्यवस्थेसाठी आणखी कालावधी द्यावा, अशी मागणी विविध कंपन्यांनी केली होती. ती मान्य करत या कंपन्यांना ३० ऑगस्टपर्यंत मूदतवाढ दिल्याचे रिझर्व्ह बॅंकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mobile wallet company Reserve Bank