मोदींनीच पुन्हा पंतप्रधान व्हावे: नारायण मूर्ती

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

नवी दिल्ली: आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा दुसऱ्यांदा पंतप्रधान मिळायला हवे अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी पंतप्रधानांचे कौतुक केली असून त्यांच्या कामाचे समर्थन केले आहे. भारतातील  भ्रष्टाचार कमी करण्यासाठी मोदींनी कठोर पावले उचलली असून त्यांच्या प्रयत्नांना यश देखील मिळाले आहे. जीएसटीबाबत देखील त्यांनी मोदींचे कौतुक केले असून जीएसटीमध्ये काही उणीवा असल्या तरी प्रत्येक गोष्टीसाठी पंतप्रधानांना जबाबदार धरता येणार नाही असे म्हणत पाठराखण केली आहे. 

मोदी सरकार चांगले काम करत असून देशाची अर्थव्यव्यस्था सुधारण्यासाठी चांगले निर्णय घेतले आहेत. शिवाय भारत स्वच्छ अभियान आणि विकासासाठी काम करणारा नेता देशाला मिळाला असून सरकार सत्तेत आल्यापासून चांगले काम केले आहे. त्यामुळे त्यांना पुढे देखील संधी मिळाल्यास ते देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल, असे मूर्ती एका इंग्रजी चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले आहेत. यावेळी मात्र मूर्ती यांनी राफेल करारावर बोलणे टाळले असून जो पर्यंत काही तथ्य समोर येत नाही तो पर्यंत मला काही माहिती नाही असेही ते म्हणाले.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Modi and his cabinet have worked very hard in reducing corruption : Narayana Murthy