Jandhan Account : खात्यात पैसे नसले तरी मिळणार 10 हजार रुपयांचा लाभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jandhan Account

Jandhan Account : खात्यात पैसे नसले तरी मिळणार 10 हजार रुपयांचा लाभ

जर तुम्ही प्रधानमंत्री जन धन योजना (Pradhanmantri Jan Dhan Yojna - PMJDY) अंतर्गत शून्य शिल्लक बचत खाते उघडले असेल तर तुम्हाला त्याच्याशी निगडीत काही फायद्यांबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. जन धन योजनेच्या खात्यात अनेक सुविधा उपलब्ध आहेत. यामध्ये तुम्हाला अपघात विमा, ओव्हरड्राफ्ट सुविधा, चेकबुकसह इतर अनेक फायदे मिळतात.

जन धन योजनेअंतर्गत तुमच्या खात्यात पैसे नसले तरी तुम्हाला 10 हजार रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळते. ही सुविधा अल्प मुदतीच्या कर्जासारखी आहे. पूर्वी ही रक्कम ५ हजार रुपये होती. मात्र केंद्र सरकारने ती आता 10 हजार रुपये केली आहे.

हेही वाचा : का हवे विचारांचे नियम आणि वास्तविक भान !

जन धन खात्याची वैशिष्ट्ये -

केंद्र सरकारची ही सर्वात महत्त्वाकांक्षी आर्थिक योजना आहे. प्रधानमंत्री जन धन योजने (PMJDY) मध्ये तुम्हाला बँकिंग/बचत आणि ठेव खाती, कर्ज, विमा इत्यादींचा लाभ तुम्हाला मिळू शकतो. तुम्ही हे खाते कोणत्याही बँकेच्या शाखेतून किंवा बँक मित्रा आउटलेटमधून उघडू शकता. प्रधानमंत्री जन धन खाते तुम्ही शून्य रुपयांमध्ये खोलू शकता.

नियम काय आहे :

ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमचे जन धन खाते 6 महिने जुने असणे आवश्यक आहे. तसेच, या खात्यातील ओव्हरड्राफ्ट सुविधेसाठी कमाल वयोमर्यादा ६५ वर्षे असावी.

हेही वाचा: नोटाबंदीच्या ६ वर्षानंतरही लोकांच्या रोख स्वरूपातील चलनात वाढ : आरबीआयचा अहवाल

अशा प्रकारे तुमचे खाते उघडा :

जर तुम्हाला प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत बँकांमध्ये खाते उघडायचे असेल तर तुम्ही कोणत्याही बँकेत जन धन खाते उघडू शकता. तुमचे दुसरे बचत खाते असल्यास तुम्ही ते जन धन खात्यात रूपांतरित करू शकता. भारतात राहणारा कोणताही नागरिक, ज्याचे वय 10 वर्षे किंवा त्याहून अधिक आहे. तो या योजनेअंतर्गत जन धन खाते उघडू शकतो.