RBI Monetary Policy : आरबीआयकडून रेपो दरात वाढ! जाणून घ्या तुमच्या कर्जावर काय होणार परिणाम? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Monetary Policy

RBI Monetary Policy : आरबीआयकडून रेपो दरात वाढ! जाणून घ्या तुमच्या कर्जावर काय होणार परिणाम?

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) दोन दिवसांच्या बैठकीनंतर आज तिसऱ्या दिवशी, RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी रेपो दरासह इतर दरांमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. RBI पॉलिसी रेट म्हणजेच रेपो रेटमध्ये 0.35 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे.

आरबीआयने मे महिन्यात अचानक रेपो दरात 0.40 टक्क्यांनी वाढ केली होती. त्यानंतर तीन वेळा रेट रेपोमध्ये 0.50 टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. सध्या रेपो दर 6.25 टक्क्यांवर आला आहे. गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज, वाहन कर्जासह इतर कर्ज महाग होणार आहेत. बँक किंवा इतर वित्तीय संस्थांकडून महाग दराने कर्ज मिळू शकते. तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त मासिक हप्ता भरावा लागेल.

हेही वाचा : Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?

रेपो रेट हा अर्थव्यवस्थेमध्ये महत्वाची भूमिका बजावतो. ज्याच्या आधारावर बँका किंवा इतर वित्तीय संस्था सामान्य लोकांना दिलेल्या कर्जावर व्याजदर ठरवतात. RBI च्या चलनविषयक धोरण समितीने (RBI MPC Meeting) रेपो दरात वाढ केल्यास, बँका सर्व प्रकारच्या कर्जांवर पूर्वीपेक्षा जास्त व्याज आकारतात. जर रेपो दरात कपात झाली तर बँका कर्जावरील व्याजदरात कपात करतात. यामुळेच गृहकर्ज, कार कर्ज आणि वैयक्तिक कर्जावर पूर्वीपेक्षा कमी-जास्त व्याज द्यावे लागते.

आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले की, चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) 6 पैकी 5 सदस्यांनी रेपो दरात बहुमताने वाढ करण्यास समर्थन दिले आणि त्यानंतर RBI ने रेपो दर 0.35 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. RBI ने सलग पाचव्यांदा रेपो दरात वाढ केली आहे.

हेही वाचा: Supreme Court : 'न्यायालय शांत बसणार नाही'; नोटाबंदीविरोधातील याचिकांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

गेल्या सप्टेंबरमध्ये, एसबीआय, यूबीएस, गोल्डमन सॅक्स, बार्कलेज आणि बँक ऑफ बडोदाच्या तज्ज्ञांनी सांगितले होते की, आरबीआयची चलनविषयक धोरण समिती डिसेंबरपर्यंत रेपो दर 6.25 टक्क्यांवर वाढवू शकते. जागतिक आर्थिक संकटे लक्षात घेता आरबीआयची रेपो दरात बदल केला आहे.

टॅग्स :Bankpolicyrbiloans