खर्चासाठी सैलावले हात; क्रेडिट कार्डद्वारे होणाऱ्या खर्चात वाढीचे निरीक्षण 

वृत्तसंस्था
Friday, 16 October 2020

मार्चमध्ये हे प्रमाण ५० हजार ५७४ कोटी रुपये होते. देशात कोरोनाचा प्रसार होण्यापूर्वी म्हणजे फेब्रुवारी २०२०मध्ये ६२ हजार १४८ कोटी रुपये खर्च केल्याचे ‘आरबीआय’ने म्हटले आहे. 

नवी दिल्ली - कोरोनाव्हायरसच्या साथीमुळे देशातील आर्थिक व्यवस्था कोलमडली होती. आता लॉकडाउन शिथिल झाल्याने अनेक क्षेत्रांतील व्यवहार सुरळीत होत असतानाच लोकांच्या हाती पैसा येऊ लागला आहे. यामुळे त्यांची क्रयशक्ती वाढू लागली आहे. रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार क्रेडिट कार्डद्वारे केला जाणारे मासिक खर्चाचे प्रमाण वाढले आहे.

ऑगस्ट महिन्यात क्रेडिट कार्डद्वारे लोकांनी ५०हजार ३११ कोटी रुपये खर्च केले आहेत. मार्चमध्ये हे प्रमाण ५० हजार ५७४ कोटी रुपये होते. देशात कोरोनाचा प्रसार होण्यापूर्वी म्हणजे फेब्रुवारी २०२०मध्ये ६२ हजार १४८ कोटी रुपये खर्च केल्याचे ‘आरबीआय’ने म्हटले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

 गेल्या वर्षीच्या तुलनेत खर्च कमी
ऑगस्ट २०१९ मध्ये क्रेडिट कार्डद्वारे ६० हजार ११ कोटी रुपये खर्च.
क्रेडिट कार्डावरील कर्जाचे प्रमाणही मार्चनंतर ऑगस्ट जास्त.
ऑगस्टमध्ये बँक क्षेत्रात कर्जाची रक्कम १.०४ लाख कोटी रुपये होती.
मार्चअखेरीस ही रक्कम १.०८ लाख कोटी रुपये. 
पतवाढ एप्रिलमध्ये कमी
देशातील बँकांची पतवाढ एप्रिल २०२०मध्ये ५.२६ टक्के एवढ्या नीचांकी पातळीवर.
याआधी १९९४ मध्ये बँकांची पतवाढ ६ टक्क्यांपर्यंत नोंदविली गेली.
जानेवारी २०२०मध्ये ही वाढ ८.५ टक्के होती
गेल्या वर्षी १०.४ टक्कांवर झालेली पतवाढ यंदा सातत्याने घटली
ठेवींमध्ये वाढ
बँकांमधील ठेवींचे मूल्य ११ सप्टेंबर रोजी संपलेल्या दोन आठवड्याच्या कालावधीत वार्षिक स्तरावर १२ टक्क्यांनी वाढले.
गेल्या वर्षी हे मूल्य १० टक्के होते.
दोन आठवड्यांमध्ये शेड्यूल्ड कमर्शिअल बँकेतील ठेवी ७१ हजार ४१७ कोटी रुपयांवरून १४२.४८ लाख कोटींवर पोचल्या.
मार्चमध्ये लॉकडाउन लागू झाल्यानंतर ठेवींमध्‍ये वाढ होत आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

साथ संपुष्टात आल्यानंतर अर्थव्यवस्था सुरळीत होऊ शकेल. कारण सध्याच्या अनिश्‍चिततेच्या काळात खर्च कमी करून बचत करण्याची लोकांची मानसिकता आहे.
- डॉ. गणेश कावडिया, अर्थशास्त्रज्ञ

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: monthly expenditure on credit cards has increased