Moodys Investor : भारताचा GDP कमी होणार; मूडीजच्या सर्वेक्षणात नेमकं काय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nirmala Sitharaman

Moodys Investor : भारताचा GDP कमी होणार; मूडीजच्या सर्वेक्षणात नेमकं काय?

Moodys Investor Service : जागतिक आर्थिक संकट आणि महागड्या देशांतर्गत कर्जाच्या प्रभावामुळे, रेटिंग एजन्सी मूडीजने 2022 साठी भारताच्या आर्थिक विकास दराचा अंदाज पुन्हा एकदा कमी केला आहे. मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसच्या मते, 2022 मध्ये भारताचा जीडीपी 7 टक्के असू शकतो. मूडीजने सलग दुसऱ्यांदा आर्थिक वाढीचा अंदाज कमी केला आहे. यापूर्वी मूडीजने मे महिन्यात जीडीपी वाढीचा अंदाज 8.8 टक्क्यांवरून 7.7 टक्क्यांवर आणला होता.

हेही वाचा : विमा पाॅलिसींचे डी-मॅट पाॅलिसीधारकांनाच पोहचवेल नुकसान?

मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने ग्लोबल मॅक्रो आउटलुक 2023-24 मध्ये म्हटले आहे की, 2022 मध्ये भारताचा GDP अंदाज 7.7 टक्क्यांवरून 7 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. मूडीजच्या मते, उच्च चलनवाढ, उच्च व्याजदर आणि जागतिक विकास दरातील मंदी यांचा विकासाच्या गतीवर परिणाम होऊ शकतो.

अहवालानुसार, महागाईचा वाढता दर, मध्यवर्ती बँकेचे कठोर आर्थिक धोरण, वित्तीय आव्हाने, भौगोलिक राजकीय बदल आणि वित्तीय बाजारातील अस्थिरता यामुळे उच्च पातळीच्या अनिश्चिततेमुळे जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या मार्गावर आहे.

हेही वाचा: Rupee vs Dollar : नऊ वर्षा नंतर रुपयाला 'अच्छे दिन'; वाचा काय आहे कारण

मूडीजने म्हटले आहे की, 2023 मध्ये जागतिक विकास दर मंदावेल आणि 2024 मध्ये तो सुस्त राहील. 2024 पर्यंत सरकार आणि केंद्रीय बँकांनी सध्याच्या आव्हानांमधून अर्थव्यवस्था सावरल्यास अर्थव्यवस्था पुन्हा तेजीमध्ये येईल.

मात्र, महागाईचा दर चिंतेचा विषय आहे. सप्टेंबर महिन्यात किरकोळ महागाई 7.4 टक्क्यांवर पोहोचली होती. चलनवाढीमुळे आरबीआयने चार वेळा पतधोरण बैठकांमध्ये रेपो दर 1.90 टक्क्यांवरून 4 टक्क्यांवरून 5.90 टक्क्यांपर्यंत वाढवला. त्यामुळे देशाचे कर्ज दिवसेंदिवस महाग होत आहे.