शेअर बाजारात मोदी लाट? 

वृत्तसंस्था
Tuesday, 12 March 2019

मुंबई: शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी तेजीत आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 355.43 अंशांनी वधारला असून 37 हजार 409.53 अंशांवर व्यवहार करतो आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजारच्या निर्देशांकात 104.95 अंशांची वाढ झाली आहे. निफ्टी 11 हजार 273 पातळीवर व्यवहार करत आहे. निवडणूक आयोगाने नुकत्याच लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यांनतर दोन दिवसांत विविध निवडणूकपूर्व जनमत चाचण्यांचे निकाल जाहीर झाले आहेत. निवडणूकपूर्व जनमत चाचण्यांमध्ये पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेवर येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मुंबई: शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी तेजीत आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 355.43 अंशांनी वधारला असून 37 हजार 409.53 अंशांवर व्यवहार करतो आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजारच्या निर्देशांकात 104.95 अंशांची वाढ झाली आहे. निफ्टी 11 हजार 273 पातळीवर व्यवहार करत आहे. निवडणूक आयोगाने नुकत्याच लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यांनतर दोन दिवसांत विविध निवडणूकपूर्व जनमत चाचण्यांचे निकाल जाहीर झाले आहेत. निवडणूकपूर्व जनमत चाचण्यांमध्ये पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेवर येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते शेअर बाजार पुन्हा एकदा मोदी लाटेवर स्वार होण्याची शक्यता आहे. 

निवडणूक आयोगाने 10 मार्च रोजी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर शेअर बाजारातील दोन्ही मुख्य निर्देशांक तेजीत आहेत. सेन्सेक्समध्ये काल आणि आज मिळून दोन दिवसात 600 अंशांची झेप घेतली आहे.  आज मुंबई शेअर बाजारात एनटीपीसी, वेदांता, पावरग्रिड, रिलायंस,टाटा मोटर्स ,आयसीआयसीआय बँक, येस बँक यांचे शेअर सर्वाधिक वधारले आहेत. तर भारती एअरटेलच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mr Market is hoping for a vote for Modi?