अंबानी आणणार भारतातील सर्वात मोठा IPO; पुढील वर्षी होणार घोषणा? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Reliance

अंबानी आणणार भारतातील सर्वात मोठा IPO; पुढील वर्षी होणार घोषणा?

मुंबई : टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता मुकेश अंबानी (Mukesh Ambanai) भारतातील सर्वात मोठा आयपीओ (IPO) आणण्याच्या तयारीत आहेत. पुढील वर्षांच्या वार्षीक सर्वसाधारण सभेत याची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एका अहवालातून ही बाब समोर आली आहे. रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडचे शेअर्स सूचीबद्ध झाल्यानंतर रिलायन्स जिओचा आयपीओ लॉन्च केला जाऊ शकतो. हे डिसेंबर 2022 मध्ये होण्याची शक्यता आहे. (Mukesh Ambani Planning To Launched IPO)

अंबानींच्या योजनेत त्यांची दूरसंचार फर्म रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म (RJPL) आणि RIL उपकंपनी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (RRVL) साठी स्वतंत्र आयपीओ समाविष्ट असून, या दोन्ही कंपन्यांच्या आयपीओच्या माध्यमातून अंबानी प्रत्येकी 50,000 कोटी ते 75,000 कोटी रुपयांची मोठी रक्कम उभारण्याचा अंबानींचा विचार असल्याचे हिंदू बिझनेस लाइनच्या अहवालात सांगण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर, रिलायन्स जिओचा स्टॉक यूएस स्टॉक मार्केट Nasdaq वर देखील सूचीबद्ध केला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Paytm IPO हा भारतातील सर्वात मोठा आयपीओ

आत्तापर्यंत, 2021 मधील Paytm IPO हा भारतातील रु. 18,300 कोटींचा सर्वात मोठा आयपीओ ठरला आहे. तर दुसरा सर्वात मोठा आयपीओ 2010 मध्ये कोल इंडियाचा ठरला होता. ज्याची रक्कम सुमारे 15,500 कोटी रुपये होती आणि तिसरा सर्वात मोठी रिलायन्स पॉवर 2008 मध्ये 11,700 कोटी रुपयांचा आहे.

टॅग्स :mukesh ambaniJioIPO