अंबानींची श्रीमंती झाली कमी; Top 10 मधील स्थान गमावले!

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 26 December 2020

जगभरातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीतून अंबानी अकराव्या स्थानावर असले तरी भारतातील श्रीमंतांच्या यादीत ते पहिल्या स्थानावरच विराजमान आहेत. मुकेश अंबानी यांच्यानंतर विप्रोचे प्रमुख अजीम प्रेमजी यांचा नंबर लागतो.  

Mukesh Ambani Out Top 10 Richest List In World : रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी (Muesh Ambani) जगातील आघाडीच्या 10 श्रीमंताच्या यादीतून अल्पावधीच बाहेर पडले आहेत. रिलायन्सच्या शेअर ढासळल्यामुळे ते 11 व्या स्थानावर आहेत.  ब्लूमबर्ग बिलिनियर्स इंडेक्सनुसार, मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती (NetWorth)  76.5 बिलियन डॉलर म्हणजेच 5.63 लाख कोटी रुपये आहे.

मुकेश अंबानी यांचे नेटवर्थ यंदाच्या वर्षात 90 बिलियन डॉलर (6.62 लाख कोटी रुपये) पर्यंत पोहचले होते. त्यामुळे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ते चौथ्या स्थानावर पोहचले होते. पण शेअरमध्ये झालेल्या घसरणीचा त्यांच्या श्रीमंतीच्या रँकींगवर परिणाम झाला आणि ते पहिल्या दहाच्या यादीतून बाहेर पडले.

look Back 2020: यावर्षी कोणत्या जीवनावश्यक वस्तूं झाल्या महाग, कोणत्या स्वस्त?

RIL च्या शेअर्समध्ये घसरणीचा परिणाम 

रिलायन्सस इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या घसरणीमुळे अंबानींच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. आणि ते पहिल्या दहा श्रीमंताच्या यादीतून बाहेर पडले आहेत.  सर्जी ब्रिन आणि स्टीव बॉल्मर यांच्या संपत्तीत वाढ झाली असून यांचा समावेश आघाडीच्या 10 श्रीमंत व्यक्तींच्या यादीत झाला आहे.  जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अमेझॉनचे प्रमुख जेफ बजोस, मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स आणि फ्रान्सचे बर्नार्ड अर्नाल्ट आणि फेसबुकचे संस्थापक प्रमुख मार्क झुकरबर्ग यांचा समावेश आहे. 

 भारतातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत अंबानीच अव्वल 

जगभरातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीतून अंबानी अकराव्या स्थानावर असले तरी भारतातील श्रीमंतांच्या यादीत ते पहिल्या स्थानावरच विराजमान आहेत. मुकेश अंबानी यांच्यानंतर विप्रोचे प्रमुख अजीम प्रेमजी यांचा नंबर लागतो.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mukesh ambani out of bloomberg billionaire top 10 richest list in world