look Back 2020: यावर्षी कोणत्या जीवनावश्यक वस्तूं झाल्या महाग, कोणत्या स्वस्त? 

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 26 December 2020

संपूर्ण वर्षात महागाईच्या पिचवर बटाटा-कांदा-टोमॅटो यांच्यासोबत दाळ, तेल, आटा आणि चहापत्ती अशा अन्नपदार्थांच्या भावामध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.

look Back 2020: संपूर्ण वर्षात महागाईच्या पिचवर बटाटा-कांदा-टोमॅटो यांच्यासोबत दाळ, तेल, आटा आणि चहापत्ती अशा अन्नपदार्थांच्या भावामध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. कांदे आणि टोमॅटांच्या दरांनी 100 चा आकडा पार केला, तर बटाटाही हाफ सेंचुरीपर्यंत गेला होता. तरी 2020 च्या शेवटच्या आठवड्यामध्ये भाज्याचे दर कमी झाले होते. 2020 मधील आवश्यक वस्तूंवर नजर टाकल्यास आज कांदा आणि गहू यांच्या किंमती सोडता सगळ्यांचा किंमती जवळपास 30 टक्कांनी वाढल्या आहेत. 

देवेंद्र फडणवीसांचा विक्रम तरुणीने मोडला; 21 व्या वर्षी झाली सर्वात तरुण महापौर!

उपभोक्ता मंत्रालयाच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, 25 डिसेंबर 2019 च्या तुलनेत 23 डिसेंबर 2020 मध्ये गहूंच्या किंमती 4 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. कांद्याच्या किंमती 58 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. मागील वर्षी 23 डिसेंबर कांद्याची सरासरी किंमत 98.67 रुपये किलो होती, सध्या कांद्याचा भाव 40.82 रुपयांपर्यंत आला आहे. काही दिवसांपूर्वी कांद्याचे दर 100 रुपयांच्या पार गेले होते. दुसरीकडे टोमॅटोच्या दरांमध्ये 21 टक्क्यांनी वाढ झाली आहे. बटाट्यांट्या दरांमध्ये 21 टक्क्यांनी वाढ झाली. या कालावधीत खुल्या चहापत्तीमध्ये 13 टक्क्यांनी वाढ झाली. चहापत्तीचे भाव 218 रुपये किलोवरुन 248 रुपयांपर्यंत गेले.

2020 मध्ये खाद्य तेलांच्या भावामध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. पाम तेल 83 रुपयांवरुन 106 रुपये, सुरजमुखी तेल 101 रुपयांवरुन 130 आणि मोहरीचं तेल 115 रुपयांवरुन 138 रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचले. शेंगदाण्याच्या तेलाच्या किंमतीमध्ये 16 टक्क्यांनी वाढ झाली. वनस्पती तेलामध्ये 25 टक्क्यांची वाढ होत 84 रुपयांचे 105 रुपयांवर गेले आहे. गुळ आणि मीठाच्या दरांमध्येही वाढ पाहायला मिळाली. 

कोरोना लसीकरणाची तयारी पूर्ण आहे का? 4 राज्यात होणार रंगीत तालीम

मंत्रालयाच्या वेबसाईटवर दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार या काळात गहूच्या किंमतीमध्ये 4 टक्क्यांनी घसरण झाली. गहू स्वस्त होऊन 27.64 रुपये प्रति किलो झाला. असे असले तरी बाजारात आटा महाग झाला होता. दाळींचा विचार केल्यास तूर दाळच्या दरांमध्ये जवळपास 19 टक्क्यांनी वाढ झाली. वाटाण्याची दाळ 88.82 रुपयांवरुन 104.87 रुपयांवर गेली. उडीद दाळ 98 रुपयांवरुन 108, मुग दाळ 90 रुपयांवरुन 104 रुपये, मसूर दाळ 65 रुपयांवरुन 79 रुपयांवर पोहोचली. साखरेच्या दरांचा विचार केल्यास या काळात साखरेच्या दरात 8 टक्क्यांनी वाढ झाली. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: look Back 2020 price rise of essential food items