मल्टी-ॲसेट फंडांसोबत मिळवा सर्वोत्तम फायदा!

उच्च चलनवाढीच्या परिस्थितीत, आर्थिक मंदी आणि व्याजदरात अल्पावधीत झालेली
multi-asset fund
multi-asset fundsakal

धनंजय काळे

उच्च चलनवाढीच्या परिस्थितीत, आर्थिक मंदी आणि व्याजदरात अल्पावधीत झालेली मोठी वाढ यामुळे जगभरात सर्वच अर्थव्यवस्थांना दीर्घकाळासाठी अनिश्चिततेचा सामना करावा लागत आहे. अशावेळी गुंतवणुकीचा विचारपूर्वक निर्णय घेण्याची वेळ आली आहे. भांडवली बाजारात दिसणाऱ्या अत्यंत अस्थिरतेच्या काळात, वेगवेगळ्या मालमत्तांमध्ये विविधांगी गुंतवणूक करून, गुंतवणुकीचा संतुलित दृष्टीकोन अंगिकारणे हा एक प्रभावी उपाय ठरू शकतो.

मालमत्तावाटप धोरणासह वैविध्यपूर्ण मालमत्तेशी संपर्क साधणे ही काळाची गरज आहे. जर एखाद्याला भांडवलाचे संरक्षण करताना २०२३ वर्ष स्थिरतेसह संपवायचे असेल, तर बहु-मालमत्ता (मल्टी-ॲसेट) फंडाची निवड करणे हा एक चांगला मार्ग आहे. बहु-मालमत्ता फंड हा एक संकरित म्युच्युअल फंड आहे, ज्याला कोणत्याही वेळी प्रत्येकामध्ये किमान १० टक्के वाटप करून तीन किंवा अधिक मालमत्तांमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक असते.

विविध फायद्यांचा आनंद

मल्टी-ॲसेट फंडांद्वारे, तुम्हाला समभागसंलग्न अर्थात इक्विटी घटकाद्वारे संपत्तीनिर्माण, रोखेसंलग्न अर्थात डेटद्वारे पोर्टफोलिओला स्थिरता आणि सोन्यातील गुंतवणुकीद्वारे महागाई आणि जागतिक जोखमींपासून बचावासह विविध फायद्यांचा आनंद घेता येऊ शकतो. विकसित बाजारपेठा प्रचंड ताणाखाली असताना, भारतीय भांडवली बाजाराने या काळात तग धरल्याचे दिसत असले, तरी गेल्या वर्षी भारतीय बाजारात दिसलेल्या अस्थिरतेकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

अनिश्चिततेच्या काळात मदत

रोखेसंलग्न गुंतवणूक ही परताव्यात स्थिरता दाखवेल, समभागसंलग्न घटक हा गुंतवणुकीला सुदृढता मिळवून देईल आणि सोन्यातून चांगला परतावा मिळेल, असा अंदाज असल्याने मल्टी-ॲसेट फंडांमधील गुंतवणूक ही २०२३ मधील अनिश्चिततेच्या मळभातून सुरक्षित वाट काढण्यास मदत करू शकेल. वर नमूद केलेल्या तीन मालमत्ता वर्गांव्यतिरिक्त, अशा फंडामध्ये रिट्स (REITs) आणि इन्व्हिट्स (InvITs) यामध्ये देखील गुंतवणुकीची लवचिकता असते.

शिवाय कव्हर केलेल्या कॉल स्ट्रॅटेजी आणि असे ऑप्शन (डेरिव्हेटिव्ह) व्यवहार; ज्यामध्ये कॉल ऑप्शन विकणाऱ्या किंवा लिहिणाऱ्या पक्षाकडे समान प्रमाणात अंतर्निहित मालमत्ता असते, अशा व्यवहारांना या फंडांतर्गत परवानगी आहे. या श्रेणीतील फंडाचा भाग म्हणून सर्व फंड घराणी या धोरणाचा वापर करीत नाहीत. पण ठळक वैशिष्ट्य म्हणजे ही रणनीती रेंज-बाउंड अर्थात बाजारकल स्पष्ट नसलेल्या स्थितीतही चांगला परतावा मिळवून देण्यास मदत करतात, ज्यामुळे पोर्टफोलिओचे एकूण उत्पन्न सुधारते.

सातत्यपूर्ण कामगिरी करणारा फंड

मल्टी-ॲसेट फंड श्रेणीमध्ये, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मल्टी-ॲसेट फंड हा सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या फंडांपैकी एक आहे. गुंतवणूकदार त्यांची दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी त्यांच्या मूळ पोर्टफोलिओचा एक भाग म्हणून या श्रेणीतील योजनांचा विचार करू शकतात.

(लेखक धनश्री इन्व्हेस्टमेंटसचे संस्थापक-संचालक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com