Share Market : गुंतवणूकदार झाले मालामाल! सरकारची 'ही' कंपनी देतेय दुप्पट रिटर्न

या शेअरने गेल्या एका महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे जवळपास दुप्पट केले आहेत.
Share Market
Share Market sakal

रेल विकास निगमचा शेअर 29 रुपयांवरून 80.60 रुपयांवर पोहोचला आहे. 52 आठवड्यांमध्ये या शेअरने हा उच्चांक गाठला आहे. या शेअरने गेल्या एका महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे जवळपास दुप्पट केले आहेत.

शेअर बाजारात रेल्वे विकास निगमचा वेग बुलेट ट्रेनसारखा झाला आहे. गेल्या 5 दिवसात या शेअरने 31 टक्क्यांहून अधिक उच्चांक गाठला आहे. आज कंपनीचा शेअर रु.80.60 वर पोहोचला आहे.

हेही वाचा : काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली?

जर आपण गेल्या एका महिन्यातील शेअरच्या कामगिरीबद्दल बोललो तर, रेल्वे विकास निगमने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे जवळजवळ दुप्पट केले आहेत. या कालावधीत 96 टक्क्यांहून अधिक परतावा गुंतवणुकदारांना दिला आहे.

गेल्या सहा महिन्यांत रेल विकास निगमच्या शेअर्सने 146 टक्क्यांहून अधिक वाढ केली आहे आणि यावर्षी आतापर्यंत 126 टक्के परतावा दिला आहे. गेल्या एका वर्षात या शेअरने 140 टक्क्यांहून अधिक झेप घेतली आहे.

Share Market
Online Shopping : ऑनलाइन शॉपिंग करताना बनावट माल कसा ओळखायचा? जाणून घ्या 'या' गोष्टी

रेल विकास निगम लिमिटेडची स्थापना भारत सरकारने 19 डिसेंबर 2002 रोजी केली होती आणि कंपनी कायदा, 1956 अंतर्गत 24 जानेवारी 2003 रोजी कंपनी म्हणून नोंदणी केली गेली होती. हा 100% केंद्र सरकारच्या मालकीचा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com