म्युच्युअल फंड गंगाजळीला फेब्रुवारी महिन्यात गळती

वृत्तसंस्था
शनिवार, 9 मार्च 2019

मुंबई: म्युच्युअल फंड गंगाजळीला फेब्रुवारी महिन्यात गळती लागली. म्युच्युअल फंडांची शिखर संघटना असणाऱ्या ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स ऑफ इंडिया’च्या (अॅम्फी) आकडेवारीनुसार फेब्रुवारी महिन्यात आघाडीच्या म्युच्युअल फंडांमधील एकूण गुंतवणुकीची रक्कम  23.16 लाख कोटी रुपयांवर जाऊन पोचली. फेब्रुवारी महिन्यात त्यात 0.89 टक्क्याची घसरण झाली. तर फेब्रुवारीमध्ये म्युच्युअल फंडातून एकूण 20,083 कोटी रुपयांचा निधी काढून घेण्यात आला आहे. 

इक्विटी आणि इक्विटीसंबंधित योजनांमध्ये फेब्रुवारी महिन्यात 5122 कोटींची गुंतवणूक झाली. त्या आधीच्या महिन्यात 6158 कोटींची गुंतवणूक झाली होती. इक्विटी आणि इक्विटीसंबंधित योजनांमध्ये सलग चौथ्या महिन्यात घसरण नोंदवण्यात आली आहे. इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ईएलएसएस) फंड्समधील गुंतवणूक फेब्रुवारीमध्ये 26 टक्क्यांनी घसरत 1,174 कोटींवर पोचली आहे. जी गेल्यावर्षी याच काळात 1,585 कोटी रुपये होती. 

म्युच्यअल फंडात दीर्घकाळ गुंतवणूक आवश्यक 
‘एसआयपी’ गुंतवणूक फायदेशीर किमान पाच- सहा वर्षांचा कालावधी डोळ्यांसमोर ठेवून गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकतो. केवळ एक- दोन वर्षांसाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करावयाची असल्यास प्रथम जोखीम लक्षात घ्यावी. म्युच्युअल फंडात एकरकमी, तसेच दरमहा टप्प्याटप्प्याने (एसआयपी) गुंतवणूक करता येते. बाजारातील चढ-उतारांचा लाभ घेत, दीर्घकाळात ‘एसआयपी’द्वारे गुंतवणूक करणे फायदेशीर ठरते. महागाईदरापेक्षा अधिक परतावा देण्याची क्षमता असणाऱ्या म्युच्युअल फंडांच्या योजनेत तज्ज्ञ सल्लागारांच्या मदतीने गुंतवणूक करणे हिताचे ठरते. 

काय आहेत फायदे?
    दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणे फायदेशीर
    महागाईदरापेक्षा अधिक परतावा देण्याची क्षमता
    बाजारातील चढ-उतारांचा लाभ घेण्यासाठी ‘एसआयपी’ उपयुक्त
    उद्दिष्टपूर्तीसाठी गुंतवणुकीचे उत्तम साधन
    तरलता, पारदर्शकता या वैशिष्ट्यांमुळे चांगली गुंतवणूक  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mutual fund assets marginally slip to Rs 23.16 lakh crore