‘म्युच्युअल फंड’च्या प्रमुखांची चौकशी

वृत्तसंस्था
Tuesday, 5 February 2019

मुंबई - एस्सेलसमूहाला आणि प्रवर्तकांना दिलासा देणाऱ्या म्युच्युअल फंड कंपन्या सेबीच्या रडारवर आल्या आहेत. एस्सेल समूहात गुंतवणूक केलेल्यांपैकी चार म्युच्युअल फंड कंपन्यांच्या प्रमुखांची आणि एका पतमानांकन कंपनीच्या प्रमुखाची सेबीने सोमवारी चौकशी केली.

एस्सेल समूहाचे अध्यक्ष आणि मुख्य प्रवर्तक सुभाषचंद्र गोयल यांनी एस्सेलसमूहाला आणि प्रवर्तकांना कर्ज दिलेल्या वित्तसंस्था आणि म्युच्युअल फंड कंपन्यांच्या प्रमुखांशी नुकतीच चर्चा केली होती. या बैठकीत एस्सेलसमूहातील ‘झी एंटरटेन्मेंट’ आणि ‘डिश टीव्ही’च्या प्रवर्तकांनी बॅंका, बिगर बॅंकिंग वित्तसंस्थांकडे (एनबीएफसी) शेअर्स गहाण ठेवून कर्ज घेतले असून, त्यांना कर्जबुडवे (डिफॉल्टर) घोषित करू नये, यावर एकमत झाले. या निर्णयाने एस्सेलसमूहाला तात्पुरता दिलासा मिळाला होता. मात्र याची सेबीने गंभीर दखल घेतली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mutual Fund Chief Inquiry