म्युच्युअल फंडमध्ये नागपूर 'Top 10' मध्ये, देशात ९५०० कोटींची मासिक गुंतवणूक

Mutual-Fund
Mutual-FundSakal

नागपूर : कोरोना संकटात भांडवली बाजारात होणारी पडझड, टाळेबंदीमुळे वाढलेली बेरोजगारी या कठीण काळातही म्युच्युअल फंडातील (mutual fund) गुंतवणूकदारांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली. जून २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये उपराजधानीतून म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूकदारांची संख्या २०० टक्क्यांनी वाढली. देशात गुंतवणुकीत आघाडीवर असलेल्या दहा शहरांमध्ये नागपूरने (top ten cities in mutual fund) नवव्या स्थानावर झेप घेतली आहे. मागील वर्षी शहर १४ व्या स्थानावर होते.

Mutual-Fund
अमेरिकी शेअर बाजारातही आता भारतीयांना करता येणार ‘ट्रेडिंग’

कोरोना संकटाने सर्वांना असुरक्षित केले. असे असताना गेल्या वर्षभराच्या संकटकाळात देखील नव्याने म्युच्युअल फंडात गुंतवणूक सुरु करणारे गुंतवणूकदार वाढले. गेल्या वर्षात भांडवली बाजारात मोठी घसरण आणि त्यानंतर झालेली वाढीनंतर म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा ओघ वाढला. नागपुरातून आतापर्यंत ३४ हजार ३४२ कोटींची गुंतवणूक म्युच्युअल फंडात झालेली आहे. दरवर्षी त्याचा आलेख सतत वाढत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. २०२० मध्ये म्युच्युअल फंडात मासिक १०० कोटींच्या गुंतवणुकीसह नागपूरचा १४ वा क्रमाक होता. २०२१ मध्ये गुंतवणूकदार वाढली आणि ती गुंतवणूक १२५ कोटीवर गेल्याने नागपूरने नवव्या स्थावर उडी घेतली आहे असे आर्थिक सल्लागार प्रदीप जाजू यांनी सांगितले.

म्युच्युअल फंडामधील शहराची श्रेणी व गुंतवणूक

वर्ष क्रमांक गुंतवणूक (मासिक) एजंट

  • २०२१ ०९ १२५ कोटी १२५

  • २०२० १४ १०५ कोटी ७६

  • २०१९ १७ ८५ कोटी ५०

टॉप 10 शहरे गुंतवणूक(कोटींमध्ये) टक्केवारी वाढीची टक्केवारी

  • मुंबई १०,४९,११९ ३१.१६ १२.७

  • दिल्ली ४,२२,५४३ १२.५५ २१.१

  • बंगलुरू १,८६,८६२ ५.५५ ४१.५

  • पुणे १,४१,०७२ ४.१९ २५.८

  • कोलकत्ता १,२९,९६१ ३.८६ २५

  • अहमदाबाद १,१२,११७ ३.३३ ४०.५

  • चेन्नई ९२,२५२ २.७५ टक्के ८.७

  • हैदराबाद ६१,२७७ १.८२ टक्के ४४

  • नागपूर ३४,३४२ १.०२ टक्के १९२.९

  • वडोदरा २५,९२५ ०.७७ टक्के ३७.४

भारतातील मासिक गुंतवणूक : ९५०० कोटी

२०२० मध्ये कोरोनाच्या साथीने शेअर बाजार झपाट्याने पडला. त्यानंतर बाजारात सुधारणा होऊ लागली. दरम्यान, रिअल इस्टेट, सोने, जमीन आणि मुदत ठेवीतून हवा तेवढा परतावा मिळत नसल्याचे अनेकांच्या लक्षात आले. त्यामुळे किरकोळ गुंतवणुकदारांनी सुलभ आणि सुरक्षित म्हणून म्युच्युअल फंडाकडे धाव घेतली. परिणामी गुंतवणूकदारांची संख्या २०० टक्के वाढली. एसआयपी हा गुंतवणुकीचा अनेकांनी पर्यायही स्वीकारला.
-गौतम जाजू, संचालक, बालाजी फायनान्स कन्सल्टन्सी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com