जेट एअरवेज: नरेश गोयल 700 कोटींची गुंतवणूक करण्यास तयार 

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 जानेवारी 2019

मुंबई: आर्थिक संकटात असलेल्या 'जेट एअरवेज'मध्ये कंपनीचे अध्यक्ष नरेश गोयल यांनी 700 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र कंपनीतील त्यांची हिस्सेदारी 25 टक्क्यांपेक्षा कमी न करण्याच्या अटीवर गुंतवणुकीस तयार असल्याचे सांगितले आहे. एतिहादने काही जाचक अटी समोर ठेवल्यानंतर गोयल यांनी ही भूमिका मांडली आहे. 'जेट एअरवेज'ला संकटातून  बाहेर काढावयाचे असल्यास गोयल यांनी कंपनीवरील आपले नियंत्रण सोडून देणे आवश्यक असल्याचे एतिहादने सांगितले आहे. 

सध्या 'जेट एअरवेज' आर्थिक संकटाशी झुंझत असून कंपनीला रोखीचा तुटवडा जाणवतो आहे.  एतिहादच्या भूमिकेबद्दल सध्या विचार सुरु आहे'' असे नरेश गोयल यांनी स्टेट बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांना पत्राद्वारे कळविले आहे. जेट एअरवेजला दिलेल्या कर्जामध्ये एसबीआयने सर्वाधिक कर्जपुरवठा केला आहे.  

''मी माझे संपूर्ण शेअर गहाण ठेवून सातशे कोटींचा निधी देण्यास देण्यास तयार आहे. मात्र माझी कंपनीतील हिस्सेदारी 25 टक्क्यांहून कमी होणार नाही याची शाश्वती मला मिळाली पाहिजे,'' असे गोयल यांनी सांगितले. 

Web Title: Naresh Goyal ready to invest Rs 700 crore in Jet Airways