अपना बँकेच्या नव्या योजनात महिलांना प्राधान्य

Apna bank
Apna bankgoogle

मुंबई : नवरात्रोत्सव, दसरा व दिवाळीनिमित्त (Navratra festival) अपना बँकेने (Apana bank) ठेवी व कर्जाच्या नव्या योजनांचा (loan new scheme) शुभारंभ केला. या योजनांचा शुभारंभ अपना बँकेचे दत्ताराम चाळके (Dattaram chalke) यांच्या हस्ते नुकताच पार पडला. नवरात्रोत्सवानिमित्त बँकेने कर्जाच्या योजनांमध्ये महिलांना प्राधान्य (women's priority) दिले आहे.

Apna bank
एमएचटी सीईटीला ९७ हजार विद्यार्थ्यांनी मारली दांडी

या प्रसंगी बोलताना दत्ताराम चाळके म्हणाले की, बँकेच्या ठेवी व कर्जाच्या नव्या योजना ग्राहकांच्या पसंतीस उतरतील, अशी आशा आहे. नवरात्रोत्सव हा स्त्री शक्तीची पूजा करण्याचा उत्सव आहे, या निमित्त बँकेने कर्जाच्या योजनांमध्ये महिलांना प्राधान्य दिले आहे. त्यांच्यासाठी आकर्षक आणि सवलतीच्या व्याजदरात कर्ज उपलब्ध होतील आणि ती त्वरित मिळतील.

कोरोनानंतर आता व्यवसाय वृद्धीसाठी उत्तम काळ असून कर्जाच्या योजनांचा लाभ घेऊन तरुण-तरुणींनी व्यवसायात उतरावे. ठेव योजनांसाठी आकर्षक व्याजदर ठेवला असून याचा सर्वांनी लाभ घ्यावा, अशी अपेक्षा चाळके यांनी व्यक्त केली. याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष अविनाश सरफरे, उपाध्यक्ष शांताराम दिवेकर, सीईओ राजन होंबाळकर, तसेच संचालक, कर्मचारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com