Nazara Technologiesने विकत घेतली रस्क मीडियाची भागीदारी

कंपनीचा स्टॉक जसजसा वाढेल तसतसा झुनझुनवालां चीही संपत्तीही वाढेल.
Nazara Technologies
Nazara Technologiesesakal
Summary

कंपनीचा स्टॉक जसजसा वाढेल तसतसा झुनझुनवालां चीही संपत्तीही वाढेल.

शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांनी गुंतवणूक केलेल्या Nazara Technologies ने 2 कोटीत रस्क मीडियामध्ये भागीदारी खरेदी केली आहे. काय आहे स्ट्रॅटेजी जाणून घेऊयात.

शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेल्या Nazara Technologiesने रस्क मीडियामध्ये मोठा हिस्सा खरेदी केला आहे. त्यांनी रस्क मीडिया लिमिटेडमध्ये सुमारे 2 कोटी रुपयांची हिस्सेदारी खरेदी केली आहे. राकेश झुनझुनवाला यांचा Nazara Technologiesमध्ये मोठा हिस्सा आहे. कंपनीचा स्टॉक जसजसा वाढेल तसतसा झुनझुनवालां चीही संपत्तीही वाढेल.

Nazara Technologies
आता अ‍ॅक्सिस बँकेचे शेअर्स घेणे योग्य ठरेल?

1601 इक्विटी शेअर्सची खरेदी

Nazara Technologies ने (Nazara tech BSE filing) 25 ऑक्टोबरला रस्क मीडियामध्ये (Rusk Media) 10 रुपयांचे 1,601 इक्विटी शेअर्स खरेदी केले आहेत आणि त्यासाठी 2 कोटी रुपये दिले आहेत. या इक्विटी शेअर्सच्या खरेदीनंतर, Nazara Technologiesकडे आता रस्क मीडियाच्या एकूण जारी केलेल्या आणि पेड-अप शेअर भांडवलापैकी 5.54 टक्के हिस्सा आहे.

एनएसईवर (NSE) Nazara Technologiesच्या शेअर्सची घोडदौड सुरू आहे. बुधवारीही शेअरमध्ये मोठी उसळी अपेक्षित आहे. त्याच वेळी, मंगळवारी हा शेअर 3.41 टक्क्यांनी वाढून 2,725 रुपयांवर पोहोचला होता. 2021 मध्ये, हा स्टॉक आतापर्यंत 71 टक्के वाढला आहे. या शेअरने गुंतवणूकदारांना एका महिन्यात सुमारे 20 टक्के परतावा दिला आहे. त्याच वेळी, कंपनीचा आउटलुक देखील खूप चांगला दिसत आहे.

Nazara Technologies
शेअर्स घ्यायचा विचार करताय ? मिडकॅपसाठी 6 दमदार स्टॉक

कंपनीकडून स्ट्रॅटेजिक टेकओव्हर

Nazara Technologiesने अलीकडेच फ्रेश इक्विटी (Fresh equity) प्रेफरंशियल ऍलोकेशन करून गुंतवणूकदारांकडून 315 कोटी जमा केले. जमा झालेला पैसा वेगवेगळ्या क्षेत्रातील धोरणात्मक टेकओव्हरसाठी वापरला जाईल. Nazara Technologies गेमिंग आणि स्पोर्ट्स मीडिया प्‍लॅटफॉर्म आहे, जिचा भारताशिवाय आफ्रिका आणि उत्तर अमेरिका यांसारख्या उदयोन्मुख आणि विकसित बाजारपेठेत व्‍यवसाय आहे.

झुनझुनवालांचा 10.82 टक्के हिस्सा

शेअर बाजारातील दिग्गज राकेश झुनझुनवाला यांच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार सप्टेंबर तिमाहीपर्यंत Nazara Technologiesमध्ये त्यांचे 32,94,310 शेअर्स आहेत. कंपनीच्या एकूण जारी शेअर्सपैकी सुमारे 10.82 टक्के शेअर्स झुनझुनवालांकडे आहेत. Nazaraचा रिअल-मनी गेमिंगवर मोठा भरवसा आहे. आर्थिक वर्ष 2022 च्या अखेरीस 100 कोटी रुपयांचा महसूल साध्य करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com