आर्सेलरमित्तलच्या 42,000 कोटींच्या व्यवहाराला 'एनसीएलटी' मंजुरी 

वृत्तसंस्था
Saturday, 9 March 2019

नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या (एनसीएलटी) अहमदाबाद खंडपीठाने आर्सेलरमित्तलच्या एस्सार स्टीलसाठीच्या 42,000 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला  मंजुरी  दिली आहे. एस्साल स्टीलचे प्रमोटर्स मित्तल यांच्या प्रस्तावाच्या स्पर्धेत होते. मात्र एनसीएलटीच्या या निर्णयामुळे एल एन मित्तल यांच्यासाठीचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे मित्तल यांना भारतीय बाजारपेठेत पाय रोवण्याची संधी मिळणार आहे. 

आर्सेलरमित्तल जगातील सर्वात मोठी पोलाद उत्पादक कंपनी आहे. जगभरात त्यांचे पोलाद व्यवसायात स्थान आहे. फक्त भारतीय बाजारपेठेपासूनच ते दूर होते. या निर्णयामुळे वेगाने विस्तारणाऱ्या भारतीय बाजारपेठेची दारे आर्सेलरमित्तलसाठी खुली होण्याची संधी निर्माण झाली आहे. एस्सार स्टीलच्या कर्जदात्यांना एनसीएलटीने आर्सेनलमित्तलच्या प्रस्तावातील 15 टक्के हिस्सा ऑपरेशनल क्रेडिटर्सना देण्याचेही सुचवले आहे. आम्ही एनसीएलटीच्या अहमदाबाद खंडपीठाच्या निर्णयाचे स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया आर्सेनलमित्तलच्या वतीने देण्यात आली आहे. एनसीएलटीने एस्सार स्टीलच्या संचालकांनी दिलेल्या प्रस्तावाला नाकारले आहे. प्रशांत रुईया यांनी कमिटी ऑफ क्रेडिटर्सने एस्सार स्टीलच्या संचालकांची विनिमय केल्यानंतरच निर्णय घ्यायला हवा अशी मागणी केली होती. एनसीएलटीने ती फेटाळून लावली आहे. रुईया यांच्यासाठी एस्सार स्टील हा त्यांच्या समूहातील मुकुटमणी आहे. मात्र आता त्यांच्यासमोर फारसे पर्याय उपलब्ध नाहीत. आपण दिलेला 54,389 कोटी रुपयांचा प्रस्ताव एस्सार स्टीलच्या लाभधारकांसाठी जास्त फायदेशीर असल्याचेही एस्सार स्टीलने म्हटले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCLT clears ArcelorMittal’s ₹42,000-cr plan for Essar Steel