होय खरंय..! वडापावच्या किंमतीत मिळताय शेअर!

होय खरंय..! वडापावच्या किंमतीत मिळताय शेअर!

मुंबई: शेअर बाजारात सध्या कोसळधारा सुरु आहेत. गेल्या महिन्याभरात शेअर बाजारात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 5.80 टक्क्यांनी तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 6.60 टक्क्यांनी घसरला आहे. अनेक दिग्गज कंपन्यांचे शेअर सध्या खूप कमी किंमतीत उपलब्ध आहेत. यात काहीही अतिशोयोक्ती नाही पण एकेकाळी दिग्गज कंपन्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या कंपन्यांचे शेअर आज वडापावपेक्षा कमी किंमतीत मिळता आहेत. 

दूरसंचार कंपन्यांचे शेअर:
व्होडाफोन आयडिया : रिलायन्स जिओने दूरसंचार क्षेत्रात पाऊल ठेवल्यानंतर इतर दूरसंचार कंपन्यांची झोप उडाली आहे. काही दूरसंचार कंपन्यांना आज कुलूप लागले आहे. तर काही कंपन्यांनी विलीनीकरणाचा मार्ग निवडला आहे. आयडिया आणि व्होडाफोनचे विलीनीकरण होऊन आता व्होडाफोन आयडिया लिमिटेड झाली आहे. शिवाय दरम्यानच्या काळात भारतीय शेअर बाजारात आयपीओ आणू पाहणाऱ्या व्होडाफोनने देखील 'आयडिया' करत आयपीओची योजना गुंडाळून आयडियाशी हातमिळवणी केली. 

सध्या मुंबई शेअर बाजारात शेअरचा भाव:
व्होडाफोन आयडिया लिमिटेडचा शेअर फक्त 6.84 रुपयांवर व्यवहार करतो आहे. 
एप्रिल 2015 मध्ये शेअरचा भाव:
 आयडियाचा शेअर होता त्यावेळी तो 115 रुपयांवर व्यवहार करत होता. 

रिलायन्स कम्युनिकेशन (आरकॉम)
चालू वर्षात अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स या दूरसंचार कंपनीने दिवाळखोरी जाहीर करण्याचा निर्णय घेतला. विविध 40 बँकांचे 46,000 कोटी रुपयांचे कर्ज डोक्यावर असलेल्या अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स या दूरसंचार कंपनीने दिवाळखोरी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. 

सध्या मुंबई शेअर बाजारात शेअरचा भाव:
आरकॉमचा शेअर 1.45 रुपयांवर व्यवहार करतो आहे. 
जानेवारी 2008 मध्ये शेअरचा भाव 
शेअर 800 रुपयांवर व्यवहार करत होता. 

सुझलॉन एनर्जी लिमिटेड
पवनऊर्जा क्षेत्रातील जगातील पाचव्या क्रमांकाची व पुण्यात मुख्यालय असलेली कंपनी सुझलॉन एनर्जी लिमिटेडची देखील तीच कहाणी आहे. कंपनीवर कर्जाचा डोंगर आहे. 2015 मध्ये कर्जफेडीसाठी जर्मनीतील उपकंपनी ‘सेन्व्हिऑन एसई’ची अमेरिकेतील सेंटरब्रिज पार्टनर्स एलपीला विक्री देखील करण्यात आली.  सुझलॉन समूहात विक्री करण्यात आलेल्या सेन्व्हिऑनकडून जवळपास 65 टक्के महसुली योगदान येत होते आणि ही दुभती गायच विकल्याने कंपनीच्या भाकड अवस्थेत आणखी भर पडण्याचे कयास देखील त्यावेळी तज्ज्ञांनी व्यक्त केले होते. त्यावेळी शेअर बाजारात कंपनीच्या शेअरवर नकारात्मक पडसाद उमटलेले दिसले. 

सध्या मुंबई शेअर बाजारात शेअरचा भाव:
सुझलॉन एनर्जीचा शेअर 4.20 रुपयांवर व्यवहार करतो आहे. 
जानेवारी 2008 मध्ये शेअरचा भाव: 
शेअर 400 रुपयांवर व्यवहार करत होता. 

मंदीत आहे संधी: 
शेअर बाजारात सध्या आपण रोज वाचतोय की गुंतवणूकदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आपण सर्वसामान्य गुंतवणूकदार हेच वाचून घाबरतो. मात्र हे नुकसान प्रत्यक्षात नसते. कारण आपण जोपर्यंत शेअर विकत नाही तोपर्यंत हे सर्व आभासी नुकसान असते. त्यामुळे शेअर बाजारासंबंधित येणाऱ्या बातम्यांमध्ये दाखविण्यात येणारे नुकसान हे प्रत्यक्षात झालेले नसते. 

शेअर बाजारात सध्या गेल्या महिन्याभरात विशेषतः अर्थसंकल्पानंतर बहुतांश कंपन्यांचे शेअर त्यांच्या वर्षभरातील (52 week Low ) नीचांकी पातळीजवळ मिळत आहेत. 'डिस्काउंट'चा फायदा घेऊन दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणाऱ्यांना मोठी संधी आहे. तीन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी गुंतवणूक करावयाची असल्यास ही सुवर्णसंधी ठरेल. बाजारातील शेअरच्या किंमती चढ-उताराचे चक्र अखंड सुरु असते. मात्र घाबरून न जाता 

आजच्या मंदीनंतर येणाऱ्या तेजीचा फायदा घेतल्यास निश्चितच ते फायदेशीर ठरेल. सध्या फक्त जोखीम पत्करण्याची आणि पडत्या बाजारात बाजारात प्रवेश करण्याची तयारी पाहिजे. 

(डिस्क्लेमर: शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या आधीन असते. त्यामुळे शेअर बाजारात व्यवहार करताना आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करा.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com