बँक ग्राहकांवर आता शुल्कवाढीचा भुर्दंड; एटीएमच्या नव्या नियमाबाबत विचार सुरु

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 22 October 2020

आरबीआयने नेमलेल्या एका समितीच्या आग्रही शिफारसीनुसार अन्य बँकेच्या एटीएममधून ५००० रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढली तर संबंधितांना २४ रुपये अतिरिक्त शुल्काचा भुर्दंड बसेल.

नवी दिल्ली - कोरोना काळात आर्थिक विवंचनांशी लढणाऱ्या बॅंक ग्राहकांना जादा शुल्कवसुलीचा आणखी एक धक्का देण्याची तयारी अर्थमंत्रालयाने आणि रिझर्व्ह बॅंकेने सुरू केली. आरबीआयने नेमलेल्या एका समितीच्या आग्रही शिफारसीनुसार अन्य बँकेच्या एटीएममधून ५००० रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढली तर संबंधितांना २४ रुपये अतिरिक्त शुल्काचा भुर्दंड बसेल. पाच एटीएम व्यवहारांनंतर हा नियम लागू करण्याची तयारी आरबीआयने केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विरोधी पक्षांनी असा विचार मुळातच मूर्खपणाचा असल्याची टीका केली आहे.  दरम्यान, एटीएममधून पैसे आले नाहीत व खात्यातून वजावट झाली तर १०० रुपये भरपाई शुल्क देण्याचाही प्रस्ताव आरबीआयने विचाराधीन ठेवला आहे. दुसऱ्या बॅंकेच्या एटीएममधून पाच वेळा पैसे काढण्यास वा अन्य व्यवहार करण्यास सध्या सवलत आहे. त्यानंतरच्या प्रत्येक व्यवहारावर २० रुपये दंडात्मक शुल्क आकारले जाते. हा नियम चालूच राहणार आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New ATM rules started Bank customers are now facing charges

Tags
टॉपिकस
Topic Tags: