'येस बँक' सुरु करणार नवी कंपनी, भागीदारीसाठी मागवले अर्ज

कठिण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी बँकेचं पाऊल
YES Bank
YES Bank

कठीण परिस्थितीतून जात असलेल्या येस बँक व्यवसाय सुरळीत व्हावा यासाठी मालमत्ता पुनर्रचना कंपनी (ARC) सुरु करण्याच्या तयारीत आहे. बँकेने यासाठी संभाव्य गुंतवणूकदारांकडून एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (EoI) मागवले आहेत. एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट म्हणजे कोणतीही कंपनी जी येस बँकेच्या या बिझनेस प्लॅनमध्ये गुंतवणुकीद्वारे सहभागी होऊ शकते, ती अर्ज पाठवू शकते. येस बँकेने 'अर्न्स्ट अँड यंग'ला या प्रकल्पासाठी सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे.

YES Bank
तीन महिन्यांच्या तुलनेत जुलैमध्ये किरकोळ महागाईत घट

येस बँकेने वर्तमानपत्रात एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्टसाठी जाहिरात दिली होती. या जाहिरातीत बँकेने मजबूत बॅलेन्सशीटवाली आणि डिस्ट्रेस्ड एसेट व्यवसायात काम करणाऱ्या कंपन्यांकडून अर्ज मागवले आहेत. येस बँकेने जाहिरातीत असेही म्हटले आहे की, संभाव्य गुंतवणूकदार ARCचे मुख्य भागीदार किंवा प्रायोजक असू शकतात. नुकत्याच प्रस्तावित राष्ट्रीय मालमत्ता पुनर्रचना कंपनी (NACL) किंवा बॅड बँकेचा भाग होणार नसल्याचे येस बँकेने आधीच सुचित केले होते. येस बँक स्वतःची मालमत्ता पूनर्रचना कंपनी स्थापन करून अधिक चांगली कर्जवसूली करू शकते असा बँकेला विश्वास आहे.

YES Bank
पूरग्रस्तांच्या विमा दाव्यासाठी बजाज अलायंझच्या अटी शिथील

संभाव्य गुंतवणूकदारांना किमान निकष पूर्ण करावे लागतील असेही येस बँकेने जाहिरातीत म्हटले आहे. मार्च 2021 मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात जागतिक स्तरावर किमान 5 अब्ज डॉलर्सचे मालमत्ता व्यवस्थापनाचे काम करणाऱ्याच कंपन्या येस बँक बँकेच्या ARC साठी अर्ज करू शकतात. या व्यतिरिक्त, गुंतवणूकदाराकडे भारतीय बाजारात ५० कोटी डॉलरची गुंतवणूक करण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. संभाव्य गुंतवणूकदारांकडे डिस्ट्रेस्ड एसेट मॅनेजमेंट आणि NPA च्या वसूलीचा जागतिक अनुभव असणे आवश्यक आहे.

YES Bank
क्रिप्टो जगतातील आतापर्यंतची सर्वात मोठी चोरी, कंपनीकडून हॅकर्सना खुलं पत्र

यांसह, गुंतवणूकदारांना RBIचे 'fit and Proper' निकष देखील पूर्ण करावे लागतील. येस बँकेच्या ARC साठी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 आहे. येस बँकेच्या नवीन उपक्रमामुळे बँकेला त्यांचे बॅड एसेट्स साफ करण्यास मदत होईल, असं विश्लेषकांचं म्हणणं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com