esakal | 4200 कोटी खर्चूनही आयकर पोर्टल बोगस; थरुरांचा सरकारवर हल्लाबोल
sakal

बोलून बातमी शोधा

4200 कोटी खर्चूनही आयकर पोर्टल बोगस; थरुरांचा सरकारवर हल्लाबोल

4200 कोटी खर्चूनही आयकर पोर्टल बोगस; थरुरांचा सरकारवर हल्लाबोल

sakal_logo
By
विनायक होगाडे

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांनी आज मंगळवारी आयकरच्या नव्या पोर्टलमध्ये असलेल्या तांत्रिक अडचणींवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला. त्यांनी असा आरोप केलाय की, या पोर्टलवर 4200 कोटी रुपये खर्च केले आहेत, तरीही वापरण्यास सहज-सुलभ असं पोर्टल बनवता आलं नाहीये. या पोर्टलमुळे नागरिकांची गैरसोयच अधिक होत आहे. पुढे त्यांनी म्हटलंय की, काँग्रेसचंच अंग असणाऱ्या 'अखिल भारतीय प्रोफेशनल काँग्रेस'शी निगडीत चार्टर्ड अकाउंटंटने त्यांना अशी माहिती दिलीय की, आयकर पोर्टलमध्ये जे नवे बदल केले गेले आहेत, ते अत्यंत खराब आहेत आणि त्यामध्ये फारच त्रुटी आहेत. तसेच या पोर्टलवर लॉगइन करण्याचा वेळ देखील वाढला आहे.

हेही वाचा: कोरोनाची दुसरी लाट संपलेली नाही; आरोग्य मंत्रालयाचा इशारा!

पुढे त्यांनी म्हटलं की, हे स्पष्ट नाहीये की, सरकारने जून महिन्यामध्ये आयकर पोर्टलमध्ये बदल का केले नाहीत? हा योग्य निर्णय ठरला असता जर गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटी अथवा नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला यामध्ये बदल केले गेले असते तर आयकरच्या रिफंडींगसाठी अडचणीच्या काळात अधिक मदत मिळाली असती.

थरुर यांनी पुढे असा आरोप केलाय की, यावर 4200 कोटी रुपये खर्च करुनही सरकार या पोर्टलला वापरण्यास लायक बनवण्यामध्ये अयशस्वी झाली आहे तसेच गैरसोयच अधिक निर्माण केल्या आहेत. आयकरने या नव्या पोर्टलची सुरुवात सात जून रोजी केली होती आणि त्यानंतर लगेचच वापरकर्त्यांनी या पोर्टलमध्ये अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या.

loading image