esakal | कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही; आरोग्य मंत्रालयाचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

Luv Agraval

कोरोनाची दुसरी लाट संपलेली नाही; आरोग्य मंत्रालयाचा इशारा!

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका वर्तवण्यात आला आहे. त्यासाठी महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी खबरदारीसाठी उपाययोजनाही सुरु केल्या आहेत. पण अद्याप कोरोनाची दुसरी लाटचं पूर्णपणे ओसरलेली नाही, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.

आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले, "कोरोनाची दुसरी लाट देशातील काही भागांमध्ये अद्यापही मर्यादित स्वरुपात कायम आहे. देशातील कोरोनाचे अॅक्टिव्ह केसेस पाच लाखांपेक्षा कमी झाले आहेत. तर ३० टक्क्यांनी त्यात घट झाली आहे. तर महाराष्ट्र, तामिळनाडू, ओडिशा, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मेघालय, सिक्कीम आणि काही इतर राज्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्हीटीचा दर १० टक्क्यांपेक्षा जास्त नोंदवला जात आहे.

कोरोना नियंत्रणाच्या प्रयत्नांचा शून्य फायदा होईल

दरम्यान, हिल स्टेशनवर गर्दी करणाऱ्या लोकांचा संदर्भ देताना आरोग्य मंत्रालयानं म्हटलं की, "अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर कोविडच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास आत्तापर्यंत कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा आपल्याला काहीही फायदा होणार नाही."

...तर पुन्हा निर्बंध लागू करु

"हिल स्टेशनवर फिरायला जाणारे लोक कोविडच्या आदर्श नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. त्यामुळे कोरोनाच्या प्रोटोकॉलचं पालन केलं नाही तर आम्ही पुन्हा निर्बंधांमधील शिथिलता रद्द करु," असा इशाराही लव अग्रवाल यांनी दिला आहे.

loading image