
गॅस सिलिंडरचे रिफिल बुक करण्यासाठी तुम्हाला नवीन नंबर डायल करावा लागेल.
चेन्नई: गॅस सिलिंडरचे रिफिल बुक करण्यासाठी तुम्हाला नवीन नंबर डायल करावा लागेल. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार, SMS-IVRS रिफिल बुकिंगसाठी संपूर्ण भारतात 7718955555 हा नवीन नंबर देण्यात आला आहे. IOCच्या एका प्रवक्त्याने सांगितले की, IVRS नवीन क्रमांक हा संपुर्ण भारतात हा नंबर दिला असून देशभरातील ग्राहकांसाठी एक सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे.
हा क्रमांक एअरटेलने जारी केला असून गॅसची नोंदणी करण्यासाठी ग्राहकांना आयव्हीआरएस कॉलमध्ये 16 अंकी क्रमांक टाइप करावा लागेल. त्यानंतर आधारचे प्रमाणीकरण करून बुकिंग सुरू करावे लागेल. याबद्दलची बातमी इंडियन एक्सप्रेसने दिली आहे.
रिफिलिंगसाठी, मोबाइल क्रमांक आधीच नोंदणीकृत असेल तर बुकिंगचा पर्याय उपलब्ध असेल. अन्यथा ग्राहकाला तोच मोबाइल क्रमांक नोंदवण्यास सांगितले जाईल.
वितरकांना बुकिंग बद्दलची ही माहिती ग्राहकांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तामिळनाडूत सुमारे 1.20 कोटी एलपीजी ग्राहक आहेत.