Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी; तुमच्या शहरांतील दर काय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Petrol-Diesel Price Today

तेल कंपन्यांनी आज पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत.

Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी; तुमच्या शहरांतील दर काय?

Petrol-Diesel Price Today : कच्च्या तेलाच्या गगनाला भिडलेल्या किमतींच्या पार्श्वभूमीवर देशातील प्रमुख तेल कंपन्यांनी गुरुवारी, 2 जून रोजी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाहीय. 22 मे पासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत.

21 मे रोजी केंद्र सरकारनं (Central Government) पेट्रोल आणि डिझेलवर आकारण्यात येणाऱ्या उत्पादन शुल्कात कपात करण्याची घोषणा केली होती, त्यानंतर 22 मेपासून देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किमती 7 रुपयांवरून 9.50 रुपये प्रति लिटरवर आल्या होत्या. केंद्र सरकारच्या घोषणेनंतर काही राज्यांनी त्यांच्या स्तरावर पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅटही कमी केला होता.

हेही वाचा: 'काश्मिरी पंडितांच्या दुकानांना केजरीवाल सरकार देणार मोफत वीज कनेक्शन'

22 मे पासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत, त्यामुळं देशातील सर्व प्रमुख शहरं आणि जिल्ह्यांमध्ये पेट्रोल-डिझेल जुन्या दरानं विकलं जात आहे. आज दिल्लीत पेट्रोलचा दर 96.72 रुपये आणि डिझेलचा दर 89.62 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत (Mumbai) पेट्रोलचा दर 111.35 रुपये तर डिझेलचा दर 97.28 रुपये प्रतिलिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 102.63 रुपये तर डिझेलचा दर 94.24 रुपये आहे. त्याच वेळी, कोलकातामध्ये तुम्हाला एक लिटर पेट्रोलसाठी 106.03 रुपये आणि डिझेलसाठी 92.76 रुपये खर्च करावे लागतील.

हेही वाचा: माजी पंतप्रधानांनी राज्यसभा निवडणुकीसाठी सोनिया गांधींकडं मागितला पाठिंबा

देशातील मोठ्या शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर काय आहेत?

 • शहर पेट्रोल दर डिझेल दर

 • दिल्ली 96.72 89.62

 • मुंबई 111.35 97.28

 • कोलकाता 106.03 92.76

 • चेन्नई 102.63 94.24

 • बंगळुरू 101.94 87.89

 • हैदराबाद 109.66 97.82

 • पाटणा 107.24 94.04

 • भोपाळ 108.65 93.90

 • जयपूर 109.46 94.61

 • लखनौ 96.57 89.76

 • तिरुवनंतपुरम 107.87 96.67

Web Title: New Rates For Petrol And Diesel Announced India Oil Corporation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top