Income Tax भरताय ? तर ही महत्त्वाची बातमी वाचा

नवीन संकेतस्थळ आल्यानंतर आयटीआर दाखल करण्याची पद्धत आणि अनुभव पूर्णपणे बदलून जाणार आहे
tax
taxtax

औरंगाबाद: प्राप्तीकर विभागातर्फे (income tax) नवीन संकेतस्थळाचे सुरु करण्यात येणार आहे. यासाठी १ ते ६ जूनदरम्यान, या संकेत स्थळाचे (new website for taxation) निर्मितीचे काम चालणार आहे. यामुळे या विभागाच्या जुन्या वेबसाईटचा वापर करता येणार नाही. ७ जून नंतर नव्या संकतेस्थळावरून कर भरणा करता येणार आहे, अशी माहिती प्राप्तीकर विभागातर्फे देण्यात आली.

नवीन संकेतस्थळ आल्यानंतर आयटीआर दाखल करण्याची पद्धत आणि अनुभव पूर्णपणे बदलून जाणार आहे. नव्या संकेतस्थळात अॅडव्हान्स फिचर्स असतील. त्यामुळे आयटीआर फाईल करणे अधिकचे सोपे होईल. नवीन वेबसाईट करदात्यांसाठी सात जूनपासून नवीन सुवीधेसह उपलब्ध होईल. प्राप्तीकर भरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यादृष्टीने जलद गतीने काम होण्यासाठी ही वेबसाईट अद्ययावत केली जात आहे. असेही प्राप्तीकर विभागाने सांगितले आहे.

tax
चांगली बातमी! लाल परी पुन्हा धावणार रस्त्यावर

या मिळतील सुविधा
- नवीन पोर्टलवर विवरण पत्र जलद गतीने तपासून परतावा लवकरात लवकर करदात्यांना प्राप्त होईल
-करदात्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी कॉल सेंटरची सुविधा उपलब्ध होणार आहे
-क्रेडिट कार्ड, युपीआय, आरटीजीएस द्वारे कर भरता येणार आहे.
-विवरण पत्र भरण्याची सुविधा अजून सोपी होणार आहे.

नवीन संकेतस्थळ लाँच होताच करदात्यांना विवरण पत्र भरणे अत्यंत सोपे होणार आहे. यामुळे निश्चितच करदात्यांची संख्या वाढेल. करदात्यांसाठी सर्व सुविधा एकाच डॅशबोर्डवर उपलब्ध करून देताना कर दात्यांचा त्रास कसा कमी करता येईल, या कडे लक्ष देण्यात आले आहे.
-अ‍ॅड. अक्षय बाहेती, कर सल्लागार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com