गुंतवणुकदारांची खाती गोठवल्याच्या चर्चा खोट्या - अदानी ग्रुप

परदेशी गुंतवणूकदारांची खाती गोठवल्याचं वृत्त दिशाभूल करणार आहे.
Gautam Adani
Gautam Adani

नवी दिल्ली : अदानी ग्रुप ऑफ कंपनीजमध्ये शेअर होल्डर असलेल्या तीन परदेशी निधी कंपन्यांची खाती नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) गोठवल्याच्या चर्चा चुकीच्या आहेत. या चर्चांद्वारे गुंतवणूकदारांची दिशाभूल केली जात आहे, असं स्पष्टीकरण अदानी ग्रुप ऑफ कंपनीजचा भाग असलेल्या अदानी पोर्ट्स (Adani Ports) आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन्स लिमिटेड (Special economic zones ltd) या कंपन्यांनी दिलं आहे. (News of freezing investor accounts is false says Adani Group)

या कंपन्यांनी आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं की, "आम्हाला हे सांगायला दुःख वाटतंय की, यासंदर्भात आलेलं वृत्त हा अत्यंत खोडसाळपणा आहे. गुंतवणूकदारांची दिशाभूल करण्याचा हा प्रकार आहे. या वृत्तामुळे गुंतवणूकदारांच्या आर्थिक पतीचं याचं कधीही भरुन न येणार नुकसानं होणार आहे तसेच कंपनीला यामुळे मोठ्या प्रमाणावर फटका बसणार आहे.

Gautam Adani
अदानी ग्रुपमध्ये गुंतवणूक केलेल्या 3 FPI वर कारवाई ; शेअर्स कोसळले

सोमवारी (१४ जून) सकाळी शेअर बाजार सुरु झाल्यानंतर NSDLनं अदानी ग्रुप ऑफ कंपनीजमध्ये शेअर होल्डर असलेल्या फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्सची (FPI) अकाउंट्स गोठवल्याच्या बातम्या आल्या आणि शेअर बाजारात एकच खळबळ उडाली. यामुळे अदानी ग्रुप ऑफ कंपनीजचे शेअर कोसळले होते.

Gautam Adani
'आणखी एक घोटाळा', सुचेता दलाल यांचे ट्विट आणि शेअर बाजारात घसरण

इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, Albula Investment Fund, Cresta Fund आणि APMS Investment Fund या तीन कंपन्यांनी अदानी एन्टरप्रायझेस, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी टोटल गॅस या कंपन्यांमध्ये एकूण ४३,५०० कोटी रुपये इतक्या किंमतीच्या शेअर्सची गुंतवणूक केली आहे. या कंपन्यांची खाती NSDLने गोठवली आहेत. पण ही खाती गोठवण्यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यानुसार फायद्याच्या मालकीच्या संदर्भात अपुरी माहिती जाहीर केल्यामुळे या कंपन्यांवर ही कारवाई करण्यात आली असावी असं सांगण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com