‘निफ्टी’ची चाल कुठवर?

राजेंद्र सूर्यवंशी
सोमवार, 30 जुलै 2018

आपला शेअर बाजार सध्या बराच तेजीत असून, निर्देशांकांनी नवे उच्चांकी विक्रम प्रस्थापित केले आहेत. अशावेळी ही तेजी कुठवर टिकणार, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या ‘निफ्टी’ या निर्देशांकात १०,६०० अंशांपासून सुरू झालेली वाढ अजून ११,५०० अंशांपर्यंत चालू राहण्याची शक्‍यता आहे. चालू आठवड्यात अमेरिका, जपान व भारत या देशातील केंद्रीय बॅंकांची पतधोरण आढावा बैठक होत असून, या बैठकीतून पुन्हा व्याजदरवाढ होईल का, याबाबत शंका राहील. सध्या किरकोळ महागाई दर ४.८७ असून, तो अनुमानित सुसह्य पातळीच्या थोडा वर आहे. घाऊक महागाई दर तुलनेने अधिक असला तरी मार्च २०१७ च्या ५.९९ दराच्या खाली आहे.

आपला शेअर बाजार सध्या बराच तेजीत असून, निर्देशांकांनी नवे उच्चांकी विक्रम प्रस्थापित केले आहेत. अशावेळी ही तेजी कुठवर टिकणार, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या ‘निफ्टी’ या निर्देशांकात १०,६०० अंशांपासून सुरू झालेली वाढ अजून ११,५०० अंशांपर्यंत चालू राहण्याची शक्‍यता आहे. चालू आठवड्यात अमेरिका, जपान व भारत या देशातील केंद्रीय बॅंकांची पतधोरण आढावा बैठक होत असून, या बैठकीतून पुन्हा व्याजदरवाढ होईल का, याबाबत शंका राहील. सध्या किरकोळ महागाई दर ४.८७ असून, तो अनुमानित सुसह्य पातळीच्या थोडा वर आहे. घाऊक महागाई दर तुलनेने अधिक असला तरी मार्च २०१७ च्या ५.९९ दराच्या खाली आहे. पावसाचे प्रमाण ठीक असल्याने व कच्च्या तेलाचे भाव पुन्हा खाली येत असल्याने रिझर्व्ह बॅंक येत्या बैठकीत दरवाढ सुचविण्याची शक्‍यता कमी आहे. अमेरिकेत दरवाढ झाली तरी आपल्या बाजाराने या बाबीला अगोदरच गृहीत धरले असल्याने त्याचा आज फार वाईट परिणाम बाजारावर होताना दिसणार नाही.

जून तिमाहीचे निकाल अपेक्षित येत असून, रिलायन्स कंपनीचा निकालही उत्तम आला आहे. निव्वळ नफा ९४५९ कोटी रुपये असून, विक्री १,४१,६९९ कोटी आहे. वार्षिक अंतराने यात अनुक्रमे १८ व ५६ टक्के वाढ झाली आहे. जून तिमाहीचे उत्तम निकाल, कच्च्या तेलाच्या भावात घसरण आणि पाऊस ठीकठाक होत असल्याने आपला शेअर बाजार अजून वाढीत राहण्याची शक्‍यता आहे. जागतिक शेअर बाजारही वाढीत दिसत असून, देशांतर्गत व परकी गुंतवणूकदार खरेदी करीत असल्याने ११,५०० अंशांजवळ पोचल्यावर ‘निफ्टी’ थांबण्याची शक्‍यता आहे.

‘निफ्टी’साठी या पातळ्या महत्त्वाच्या
११,१५० व ११,५०० अंश 

तांत्रिक कल कसा राहील?
मागील शुक्रवारी ‘निफ्टी’ ११,३०८ अंशांवर बंद झाला असून, या आठवड्यासाठी ११,१५० व ११,५०० अंश या पातळ्या महत्त्वाच्या आहेत. १०,६०० अंशांवरून सुरू झालेली सलग वाढ ही जर निफ्टी ११,३०० अंशांवर अर्धा दिवस टिकला तर पुढेही ११,५०० अंशांपर्यंत चालू राहण्याची शक्‍यता आहे. या आठवड्यात ‘निफ्टी’त चढ-उतार राहण्याची शक्‍यता आहे; ‘निफ्टी’ ११,१५० अंशांखाली घसरला, तर पुढे ११,००० अंशांपर्यंत जाण्याची शक्‍यता राहील. ‘बॅंक निफ्टी’ २७,५०० अंशांच्या वर टिकला तर पुढे २८,००० अंश ही वरची जवळची पातळी असेल.

(डिस्क्‍लेमर - लेखकाने स्वतःच्या अभ्यासानुसार वरील मत व अंदाज व्यक्त केले आहेत. शेअर बाजारातील जोखीम लक्षात घेऊन वाचकांनी गुंतवणुकीचे निर्णय स्वतःच्या जबाबदारीवर घेणे अपेक्षित आहे.)

Web Title: Nifti share market sensex