esakal | निर्देशांकांची सलग दुसरी घसरण; येत्या काळात पाहायला मिळणार मोठी घसरण?
sakal

बोलून बातमी शोधा

निर्देशांकांची सलग दुसरी घसरण; येत्या काळात पाहायला मिळणार मोठी घसरण?

गेले दोन दिवस निर्देशांकांची घसरण सुरु असून आज सेन्सेक्स बावन्न हजारांचा स्तर तोडून  51,703 अंशांवर स्थिरावला

निर्देशांकांची सलग दुसरी घसरण; येत्या काळात पाहायला मिळणार मोठी घसरण?

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई, ता. 17 :  साडेपंधरा हजारांच्या जवळ गेलेला निफ्टी आणि त्रेपन्न हजारांकडे झेपावणारा सेन्सेक्स यांना काल लागलेला ब्रेक आजही कायम राहिला. आज दिवसअखेरीला सेन्सेक्स 400 अंशांनी तर निफ्टी 104 अंशांनी घसरलेले पाहायला मिळाला.  

गेले दोन दिवस निर्देशांकांची घसरण सुरु असून आज सेन्सेक्स बावन्न हजारांचा स्तर तोडून  51,703 अंशांवर स्थिरावला. तर निफ्टी 15208 अंशांवर बंद झाला. सेन्सेक्सच्या प्रमुख 30 समभागांपैकी स्टेटबँक, पॉवरग्रीड, एनटीपीसी, रिलायन्स, बजाज ऑटो, ऍक्सिस बँक, महिंद्र आणि महिंद्र व एअरटेल हे समभाग दोन टक्क्यांपर्यंत वाढले.

महत्त्वाची बातमी वीज ग्राहकांच्या मागण्या मान्य न केल्यास 'भाजप'चे जेलभरो आंदोलन; 'या' आहेत भाजपच्या 7 मागण्या

तर नेस्ले, बजाज फिनसर्व्ह, एशीयन पेंट्स, एचडीएफसी बँक, इंडसइंड बँक, मारुती, डॉ. रेड्डी हे समभाग दोन ते तीन टक्के घसरले. 

आजचे सोन्याचांदीचे दर

  • 24 कॅरेट सोने (10 ग्रॅम) - 46,690 रु.
  • चांदी (1 किलो) - 69,600 रु.

बजेटनंतर शेअर मार्केट सुसाट पळताना पाहायला मिळालं होतं. मात्र आता निफ्टीच्या चार्टवर संभ्रमावस्था पाहायला मिळतेय. गेल्या काही दिवसांमध्ये निफ्टीमध्ये सातत्याने संभ्रमावस्था पाहायला मिळतेय.  त्यामुळे येत्या काळात मार्केटमध्ये करेक्शन येईल असं तज्ज्ञ सांगतायत. 

nifty and sensex falls for second consecutive day big crash expected in coming days

loading image