Stock Market: भांडवली बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्समध्ये 251.51 तर निफ्टीत 60 अंशांनी घट

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 25 November 2020

भारतीय भांडवल बाजारात मोठी घसरण झाली असून, निफ्टी 13 हजारांच्या खाली गेला आहे.

नवी दिल्ली: #Nifty- भारतीय शेअर बाजारात मागील काही दिवसांपासून मोठा चढउतार दिसत आहे. आजच्या सत्राच्या सुरुवातीला सेन्सेक्स आणि निफ्टीत वाढ झाली होती. पण आता सेन्सेक्समध्ये अचानक घसरण झाल्याचे दिसले आहे.

सध्या सेन्सेक्समध्ये 0.57 टक्क्यांची म्हणजे 251.51 अंशांची घट होऊन 44,287 अंशावर आला आहे. तर निफ्टीतही 0.50 टक्क्यांनी म्हणजे 60 अंशांनी घट झाली असून निफ्टी 12992.10 वर गेला आहे. यामुळे निफ्टी 13 हजारांच्या खाली गेला आहे.

मागील आठवड्यापासून भारतीय भांडवली बाजारात मोठे रेकॉर्ड होत गेल्याचे दिसले होते. निफ्टी पहिल्यांदाच 14 हजारांच्या पुढे गेला होता, पण आजच्या घसरणीमुळे तो पुन्हा 14 हजारांच्या खाली घसरला आहे. BSE मधील मिडकॅप शेअर्समध्ये जवळपास 1 टक्क्यांची घट झाली आहे. 

HDFC, सन फार्मा, भारती एअरटेल, टीसीएस, HUL, टेक महिंद्रा, मारुती सुजूकी, इन्फोसिसच्या शेअर्समध्ये घट झाली आहे. तर UltraTech Cement, ICICI bank, ITC, बजाज अॅटो, इंडसलॅंड बॅंक यांच्या शेअर्स वधारले आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NIFTY and SENSEX show instant slumps shares down