esakal | शेअर बाजारात घसरण; निफ्टी 10 हजारांच्या पातळीवर कायम
sakal

बोलून बातमी शोधा

शेअर बाजारात घसरण; निफ्टी 10 हजारांच्या पातळीवर कायम

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने  सकाळच्या सत्रात शतकी झेप घेतली होती.  मात्र बाजारात दुपारच्या सत्रात विक्रीचा मारा  वाढल्याने बाजार नकारात्मक पातळीवर बंद झाला.    

शेअर बाजारात घसरण; निफ्टी 10 हजारांच्या पातळीवर कायम

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई - भारतीय शेअर बाजारात सलग सहा दिवसांच्या तेजीनंतर गुरुवारी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने सकाळच्या सत्रात शतकी झेप घेतली होती. मात्र बाजारात दुपारच्या सत्रात विक्रीचा मारा वाढल्याने बाजार नकारात्मक पातळीवर बंद झाला. सेन्सेक्स 128 अंशांच्या घसरणीसह 33 हजार 980  पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 32 अंशांची घसरण झाली. तो 10 हजार 29 पातळीवर बंद झाला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आशियाई बाजारातील घसरण आणि "मुडीज'ने देशातील विविध क्षेत्रांच्या मानांकनात घसरण केल्याने त्याचे पडसाद भारतीय शेअर बाजारावर उमटले. देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शिवाय कोरोना रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या दीर्घकालीन लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले असल्याचे उद्योग जगतात चर्चा सुरू झाली आहे. 

एफएमसीजी, ऑटो कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूकदारांनी विक्री मारा सुरू केला. मात्र हेल्थकेअरमधील शेअर तेजीत होते. लुपिन , ग्लेनमार्क, टोरंटफार्मा, जुबिलंट, सन फार्मा, बायोकॉन या कंपन्यांचे शेअर सर्वाधिक वधारले. चौथ्या तिमाहीतील निकालांचे पडसाद आता बाजारावर उमटू लागले आहेत. 

सेन्सेक्सच्या मंचावर इंडियन ऑईल, ओएनजीसी, टायटन, महिंद्रा अँड महिंद्रा, एचडीएफसीच्या शेअरमध्ये सर्वाधिक घसरण झाली. तर टीसीएस, पॉवरग्रीड, एचडीएफसी बँक, एचसीएल टेक आणि आयसीआयसीआय कंपनीच्या शेअरमध्ये सर्वाधिक वाढ झाली. 

चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया 75.48 रुपये प्रतिडॉलर स्थिरावला.