
मार्चपासून आतापर्यंत निफ्टी गुंतवणूकदारांना जवळपास 50 टक्क्यांचा रिटर्न मिळाला आहे.
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनमुळे बाधित काही रुग्ण सापडल्यानंर महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये लागू केलेल्या प्रतिबंधांमुळे आज शेअर बाजारात सकाळच्या सत्रात भलेही तेवढी तेजी पहायला मिळाली नसेल. मात्र, गुंतवणूकदार ज्या प्रकारच्या परिस्थितीची वाट पाहत होते, ती परिस्थिती वर्षाच्या शेवटच्या दिवशी तरी मिळाली. आज निफ्टी 50 निर्देशांकाने 14,000 अंकांचा टप्पा पार केला आहे. मार्चपासून आतापर्यंत निफ्टी गुंतवणूकदारांना जवळपास 50 टक्क्यांचा रिटर्न मिळाला आहे.
हेही वाचा - परकीय चलनसाठा म्हणजे काय? जाणून घ्या सर्वकाही
निफ्टीचा 14000 टप्पा पार
आज नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये निफ्टी-फिफ्टी 25 अंकांनी वाढत 14,006 वर जाऊन पोहोचला. हे पहिल्यांदाच घडलंय की जेंव्हा निफ्टीने 14 हजारांचा टप्पा पार केला आहे. दुसरीकडे आज शेअर बाजार स्थिर आहे. बाँबे स्टॉक एक्सचेंजमध्ये सेंसेक्स 40.89 अंकाच्या किरकोळ वाढीसह 47787.11 अंकांवर आहे.
इक्वीटी इंडेक्स निफ्टी 50 निर्देशांकाने 8.2 टक्क्याने वाढ घेत 13,000 वरुन 14,000 पर्यंतचा टप्पा गाठला आहे. निफ्टी निर्देशांक मार्च 2020 मध्ये नोंदवलेल्या 52 आठवड्यांतील सर्वांत नीचांकी निर्देशांक ठरलेल्या 7,511 च्या जवळपास 90% वाढला आहे. 30 डिसेंबरपर्यंत, या वर्षात निर्देशांक 15% वाढला आणि यामुळे 2017 पासून सर्वोत्कृष्ट वार्षिक रिटर्न नोंदविला गेला आहे.