परकीय चलनसाठा म्हणजे काय? जाणून घ्या सर्वकाही

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 31 December 2020

सध्या जगात चीनजवळ जगातील सर्वांत अधिक परकीय चलनसाठा आहे.

नवी दिल्ली : परकीय चलनसाठ्याला 'Reserve Currency' असंही म्हणतात. हा चलनसाठा परकिय असतो. प्रत्येक देशाची सेंट्रल बँक ही रक्कम औपचारिक रित्या साठा म्हणून जमा करत असते. बहुतांश देश आपला साठा खुल्या आणि मोठ्या बाजारात चालणाऱ्या चलनातच ठेवतात, जेणेकरुन ही रक्कम गरज असेल तेंव्हा काढून घेता आली पाहिजे, हा त्यामागचा उद्देश असतो. 

परकीय चलनसाठा म्हणजे काय?

अधिक परकिय चलनसाठा असलेल्या देशाची आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगली प्रतिमा असते. कारण आंतराराष्ट्रीय व्यापारात या चलनसाठ्यावरुन ठरणाऱ्या प्रतिमेचा चांगला उपयोग होतो. 1991 च्या आर्थिक संकटामध्ये भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर डिफॉल्टर घोषित होण्याच्या उंबरठ्यावर होता. चांगला परकिय चलनसाठा असणारा देश परराष्ट्रीय व्यापारात चांगला भाग प्राप्त करतो. 

 • सर्वाधित परकिय चलनसाठा हा अमेरिकन डॉलरमध्ये ठेवला जातो कारण डॉलर हे जगातील सर्वाधिक व्यवहारात वापरले जाणारे आणि विश्वासू चलन आहे. 
 • चीनजवळ जगातील सर्वाधिक US $ 3.1 ट्रिलियन परकिय चलनसाठा आहे.
 • अमेरिकेकडे मार्च 2020 मध्ये फक्त US$ 129,264 मिलियनचे परकिय चलन होते.
 • भारत जगात सर्वाधिक परकिय चलनसाठा करणाऱ्या देशांमध्ये पाचव्या स्थानी आहे. 
 • भारताच्या परकिय चलनसाठ्याने 29 मे 2020 रोजी 493 बिलियन अमेरिकन डॉलर या आतापर्यंतच्या सर्वोच्च स्थानी गवसणी घातली होती. 
 • परकिय चलनसाठा एखाद्या अर्थव्यवस्थेच्या आरोग्यातपासणीच्या  मीटरसारखा असतो. जर एखाद्या देशाजवळ परकिय चलनसाठा चांगला असेल तर त्या देशाच्या आर्थिक स्थितीला आंतरराष्ट्रीय पातळीवर खूपच उच्च समजले जाते. 

हेही वाचा - जानेवारीत 14 दिवस राहणार बँका बंद; व्यवहार करण्याआधी जाणून घ्या कधी आहेत सुट्या

सध्या जगात चीनजवळ जगातील सर्वांत अधिक परकीय चलनसाठा आहे. चीनचा परकीय चलनसाठा हा $ 3,091,459 मिलियन (US $ 3 ट्रिलियन) होते आणि त्यानंतर जपानचे 1,368,567 मिलियन अमेरिकन डॉलर होते. परकिय चलनसाठ्यामध्ये भारताचे स्थान पहिल्या पाच देशांमध्ये आहे. मे 2020 च्या शेवटाला भारताचा परकिय चलनसाठा 493 बिलियन अमेरिकन डॉलर होता.

परकिय चलनसाठ्याचे महत्त्व

 • अमेरिकन डॉलरमध्ये मोजल्या जाणाऱ्या ‘परकीय चलन मालमत्ता’मध्ये ‘नॉन युएस करन्सीज’च्या (म्हणजे युरो, ब्रिटिश पौंड, जपानी येन, ज्यामध्ये भारतीय रिर्झव्ह बँक आपला परकीय चलन साठा ठेवते) विनिमय मूल्यात होणारी घट किंवा वाढीचा परिणाम समाविष्ट असतो.
 • थेट गुंतवणूक, त्याचबरोबर शेअर बाजारात झालेली गुंतवणूक याचा विचार करून परकीय चलन विनिमय दरानुसार या साठ्यांचे मूल्यांकन केले जात असते.
 • परकीय चलन साठा केंद्रीय बँकासाठी महसूल मिळविण्याच्या प्रमुख स्रोतांपैकी एक आहेत, जे परकीय सरकारी रोख्यांमध्ये पैसे गुंतवितात आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि इतर सुरक्षित गुंतवणूकीच्या पर्यायांमध्ये देखील गुंतवणूक करतात.
 • परकिय चलनसाठ्यामध्ये परदेशी चलन, गोल्ड रिझर्व्ह, SDR आणि  IMF कोटा डिपॉसिट, ट्रेझरी बिल, बॉन्ड आणि इतर सरकारी सिक्यूरीटीज समाविष्ट असतात. भारतात RBI ही परकीय चलनसाठ्यास जबाबदार आहे. 

 


  स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
  Web Title: What is a reserve currency know all about reserve currency