esakal | सलग तिसऱ्या दिवशी भारतीय बाजारांत नफावसुली, निफ्टी पंधरा हजारांखाली, सेन्सेक्स 397 अंशांनी घसरला
sakal

बोलून बातमी शोधा

सलग तिसऱ्या दिवशी भारतीय बाजारांत नफावसुली, निफ्टी पंधरा हजारांखाली, सेन्सेक्स 397 अंशांनी घसरला

बाजार उघडताना सकाळी 51 हजारांच्या जवळ असलेला सेन्सेक्स नंतर 50 हजारांखाली घसरला होता

सलग तिसऱ्या दिवशी भारतीय बाजारांत नफावसुली, निफ्टी पंधरा हजारांखाली, सेन्सेक्स 397 अंशांनी घसरला

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आज मुंबई शेअर बाजार कोसळलेला पाहायला मिळाला. गेल्या आठवड्यातही भरतोय निर्देशांक सातत्याने पडताना पहाया मिळाला. नफावसुलीमुळे आजही भारतीय निर्देशांकांची घसरण सलग तिसऱ्या दिवशीही सुरु राहिली.

( Nifty 50 ) निफ्टी 101 अंशांनी घसरून 15 हजारांच्याखाली 14,929 अंशांवर स्थिरावला. तर मुंबई शेअर बाजार ( BSE ) म्हणजेच सेन्सेक्स देखील 397 अंशांनी कोसळून पन्नास हजारांच्यावर राहण्यास यशस्वी ठरला. 

बाजार उघडताना सकाळी 51 हजारांच्या जवळ असलेला सेन्सेक्स नंतर 50 हजारांखाली घसरला होता. मात्र त्या पातळीवर खरेदी सुरु झाल्याने दुपारनंतर तो सावरला आणि दिवसअखेरीस 50,395 अंशांवर बंद झाला.

महत्त्वाची बातमी : देशाची आर्थिक राजधानी 'मुंबई'त लॉकडाऊन लागणार का ? राजेश टोपेंनी केलं स्पष्ट

आजचे सोन्याचांदीचे दर

  • 24 कॅरेट सोने (10 ग्रॅम) - 44,840 रु.
  • चांदी (1 किलो) - 67,400 रु.

आज सेन्सेक्समधील 30 प्रमुख समभागांपैकी 11 समभाग नफ्यात तर 19 समभाग तोट्यात बंद झाले. यामध्ये नफ्यात राहणाऱ्या समभागांमध्ये टेक महिंद्र, इंडसइंड बँक, एचसीएल टेक, एनटीपीसी हे समभाग एक ते दोन टक्के वाढले. त्याखेरीज टीसीएस व स्टेट बँक या समभागांच्या दरांमध्येही वाढ झाली. तर बजाज फिनसर्व्ह, बजाज ऑटो, बजाज फायनान्स, लार्सन टुब्रो, एशियन पेंट्स आणि डॉ. रेड्डी हे समभाग दोन टक्क्यांच्या आसपास वधारले. 

nifty down by 101 points and sensex down by 397 points indian market closed in red for third consecutive day

loading image