esakal | शेअर बाजारात नवे उच्चांक 
sakal

बोलून बातमी शोधा

शेअर बाजारात नवे उच्चांक 

शेअर बाजारात नवे उच्चांक 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई: मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने आज (मंगळवार) पुन्हा एकदा उच्चांकी पातळी गाठली. सेन्सेक्सने इंट्राडे व्यवहारात 39 हजार 277.96 अंशांची सर्वोच्च पातळी गाठली आहे. त्याबरोबरच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने 11 हजार 787.05 अंशांची आतापर्यंतची उच्चांकी पातळी गाठली. जागतिक बाजारांकडून मिळालेल्या सकारात्मक संकेतांमुळे दोन्ही निर्देशांक वधारले आहेत. 

सध्या (दुपारी 12 वाजून 38 मिनिटे) सेन्सेक्स 340.65 अंशांनी वधारला असून तो 39 हजार 246 अंशांवर व्यवहार करतो आहे. तर निफ्टी 11 हजार 780 अंशांवर व्यवहार करतो आहे. त्यामध्ये 90.25 अंशांची वाढ झाली आहे. सध्या मुंबई शेअर बाजारात आयसीआयसीआय बँक, कोल इंडिया, हिरो मोटोकॉप, वेदांता आणि एशियन पेंट्स यांचे शेअर सर्वाधिक वधारले आहेत. तर टाटा मोर्टस टीव्हीआर, टाटा मोटर्स, इन्फोसिस, टाटा स्टील आणि एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे. 

loading image