
धातू, वाहन उद्योग व आयटी कंपन्यांच्या समभागांच्या जोरावर आज राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने 13,109.05 असा बंद भावाचा सार्वकालिक उच्चांक नोंदवला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने आज 505 अंशांची वाढ नोंदवत तो 44,655.44 वर बंद झाला.
मुंबई : धातू, वाहन उद्योग व आयटी कंपन्यांच्या समभागांच्या जोरावर आज राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने 13,109.05 असा बंद भावाचा सार्वकालिक उच्चांक नोंदवला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने आज 505 अंशांची वाढ नोंदवत तो 44,655.44 वर बंद झाला.
निफ्टीने आज 140 अंशांची वाढ नोंदवली. सत्र सुरू असताना निफ्टीने 13,128.40 अंश असा सार्वकालिक उच्चांक नोंदवला. यापूर्वी निफ्टीने 24 नोव्हेंबर रोजी सत्र सुरू असताना 13,079.10 अंश (बंद भाव 13,055.15) असा सार्वकालिक उच्चांक नोंदवला होता. सेन्सेक्सने आज 44,655.44 वर बंद होत 25 नोव्हेंबरच्या 44,825.37 या आपल्या सार्वकालिक उच्चांकापासून तो दूरच राहिला.
आज सनफार्मा, इंडस्इंड बॅंक, ओएनजीसी, टेक महिंद्र, एअरटेल, इन्फोसिस, महिंद्र आणि महिंद्र, मारुती सुझुकी, आयसीआयसीआय, टाटा स्टील आदी कंपन्यांच्या समभागांचे दर वाढले. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या संकेतस्थळानुसार आज निफ्टीचे पीई गुणोत्तर 36.05 एवढे झाले आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या संकेतस्थळानुसार निर्देशांकाचे पीई गुणोत्तर 32.05 एवढे झाले आहे.
----------------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)