आगामी वर्षात अर्थव्यवस्थेत सात टक्के वाढ होणार; निर्मला सीतारामन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nirmala Sitharaman statement India economy grew by 7 percent 2023

आगामी वर्षात अर्थव्यवस्थेत सात टक्के वाढ होणार; निर्मला सीतारामन

नवी दिल्ली : भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये सन २०२३ मध्ये ७ टक्क्यांची वाढ होईल, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. आगामी अर्थसंकल्प तयार करताना अर्थव्यवस्थेची वाढ कायम राहील आणि महागाई नियंत्रणात राहील याची काळजी घेणे आवश्यक आहे, असेही अर्थमंत्री म्हणाल्या. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आपली वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलूक रिपोर्ट नुकतीच जारी केली. त्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्र्यांचे हे विधन महत्त्वाचे मानले जात आहे. या अहवालात भारताच्या अर्थव्यवस्थेतील वाढीत घट दाखवण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताच्या अर्थव्यवस्थेतील वाढीत ०.६० टक्केंची कपात दाखवली आहे. त्यानुसार २०२३ मध्ये जीडीपीची वाढ ६.८ टक्के असेल असे सांगण्यात आले. याआधी ही वाढ ७.४ टक्के असेल असे सांगण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री सीतारामण म्हणाल्या, की आगामी केंद्रीय अर्थसंकल्प बनवताना काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. ज्यात अर्थव्यवस्थेच्या वाढीची गती कायम राहील हेही पाहणे आवश्यक आहे.