11 वर्षांत पगारात एक रुपयाचीही वाढ नाही, तरीही ते खुश!

वृत्तसंस्था
शनिवार, 20 जुलै 2019

 मुंबई: जर एखाद्या नोकरदाराला 11 वर्षात एक रुपयांचीही पगारवाढ दिली नाही तर? हा विचार करणेही शक्य नाही. पण देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी गेल्या 11 वर्षांपासून 1 रुपायचीही पगार वाढ घेतलेली नाही. गेली सलग 11 वर्षे त्यांचा पगार फक्त वार्षिक 15 कोटी रुपये एवढाच राहिला आहे. मात्र त्यांच्या सहकाऱ्यांचा पगार 20 कोटींच्या घरात पोचला आहे. मुकेश अंबानींचे नातेवाईक आणि सहकारी असलेल्या निखील मेस्वनी आणि हितल मेसवानी आणि अन्य पूर्णवेळ संचालकांना घसघशीत पगारवाढ दिली गेली आहे.

 मुंबई: जर एखाद्या नोकरदाराला 11 वर्षात एक रुपयांचीही पगारवाढ दिली नाही तर? हा विचार करणेही शक्य नाही. पण देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी गेल्या 11 वर्षांपासून 1 रुपायचीही पगार वाढ घेतलेली नाही. गेली सलग 11 वर्षे त्यांचा पगार फक्त वार्षिक 15 कोटी रुपये एवढाच राहिला आहे. मात्र त्यांच्या सहकाऱ्यांचा पगार 20 कोटींच्या घरात पोचला आहे. मुकेश अंबानींचे नातेवाईक आणि सहकारी असलेल्या निखील मेस्वनी आणि हितल मेसवानी आणि अन्य पूर्णवेळ संचालकांना घसघशीत पगारवाढ दिली गेली आहे. निखील आणि हितल मेसवानी यांचा पगार 16.85 कोटींवरून 20.57 कोटींवर पोचला आहे.

कंपनीच्या नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात मुकेश यांनी 2008-09 मध्ये घेतलेल्या पगार, अन्य भत्ते आणि कमिशन इतके म्हणजे 15 कोटीच असल्याचे जाहीर केले आहे. त्यापूर्वी त्याचे हे वेतन 24 कोटी होते. सीईओचे पगार ठराविक स्तरावर असावेत वा कसे यासंदर्भात वाद सुरु झाल्यापासून मुकेश यांनी स्वेच्छेने वेतन सीमा ठरवून घेतली असल्याचे सांगितले जात आहे. मुकेश यांच्या वेतनात 4.49 कोटी पगार भत्ता, 9.53 कोटी कमिशन आणि अन्य सुविधा 27 लाख याचा समावेश आहे.

गेल्या 11 वर्षात मुकेश अंबानींच्या पगारात वाढ झाली नसली तरी त्याच दुःख वाटण्याचं त्यांना काहीच कारण नाही. याच 11 वर्षात त्यांच्या एकूण उत्पन्नात कित्येक कोटींनी वाढ झाली आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची रिलायन्स इंडस्ट्रीज उद्योग समूहात असलेली 48 टक्क्यांची मालकी. कंपनीतील 48 टक्क्यांच्या मालकीमुळे हजारो कोटींचा लाभांश एकट्या मुकेश अंबानींच्या वाट्याला आला आहे. ज्या तुलनेत त्यांचा पगार आहे नगण्य आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No salary hike for Mukesh Ambani for 11 years, here's how much he earns