esakal |  बांधकाम क्षेत्रात न्युवोकोने आणले पर्यावरणस्नेही उत्पादन 
sakal

बोलून बातमी शोधा

 बांधकाम क्षेत्रात न्युवोकोने आणले पर्यावरणस्नेही उत्पादन 

 बांधकाम क्षेत्रात न्युवोकोने आणले पर्यावरणस्नेही उत्पादन 

sakal_logo
By
टीम ईसकाळ

मुंबई: बांधकाम उत्पादने तयार करणाऱ्या न्युवोको विस्टास कॉर्पने 'काँक्रीटो ग्रीन' या नव्या कल्पक व पर्यावरणस्नेही सिमेंट बाजारात आणले आहे. अन्य सिमेंटच्या तुलनेत या सिमेंटमध्ये 25 टक्के कमी पाणी वापरले जाते. बांधकाम क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे कमी पाणी लागणारे हे उत्पादन भारतीय बांधकाम क्षेत्रासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. काँक्रीटो ग्रीनचे सादरीकरण राजस्थान येथे करण्यात आले असून आगामी काळात देशभरात हे उत्पादन सर्वत्र सादर करण्यात येणार आहे.

मुंबईतल्या न्युवोकोच्या कंस्ट्रक्शन डेव्हलपमेंट एंड इनोव्हेशन सेंटरमध्ये (सीडीआयसी)  विकसित करण्यात आलेले काँक्रीटो ग्रीन हे उत्पादन दीर्घकालीन पर्यावरणीय परिणाम लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहे. संशोधनानुसार, बांधकाम क्षेत्रामुळे 54 टक्के भारत पाण्याच्या अती टंचाई ते तीव्र टंचाईचा सामना करतो. 2018 मध्ये एकट्या राजस्थानातल्या 8 जिल्ह्यांमध्ये पाणीपातळी खूपच खालावली होती. म्हणूनच, पाण्याची नासाडी रोखून पाणीपातळी कायम राखण्यात काँक्रीटो ग्रीनसारखे उत्पादन उपयुक्त ठरणार आहे. पाणीपातळी कमी असतानाही काँक्रीटो ग्रीन हे उत्पादन कमी आकुंचन आणि चांगली कार्यक्षमता प्रदान करते; पाणी प्रवेश आणि क्लोराईड आक्रमणासाठी सामर्थ्य आणि टिकाऊपणा देते. अत्यंत दर्जेदार, टॅम्पर-प्रूफ आणि मॉईश्चर-प्रूफ 50 किलोच्या बॉक्स फोल्ड बॅग्जमध्ये काँक्रीटो ग्रीन हे उत्पादन उपलब्ध असून यामुळे सिमेंटची गुणवत्ता आणि ताजेपणा टिकून राहतो.

न्युवोको विस्टास कॉर्पच्या मुख्य धोरण आणि विपणन अधिकारी मधुमिता बासू म्हणाल्या, “काँक्रीटो ग्रीनच्या माध्यमातून, बांधकाम व्यवसायासाठी हरित व स्मार्ट पर्याय पुरवण्याची न्युवोकोची बांधिलकी आम्ही आणखी पुढे नेत आहोत. राजस्थान हे देशातले सतत दुष्काळाचा सामना करणारे राज्य  आहे. जिथे पिण्याच्या पाण्याचे देखील कमतरता असते. राजस्थानसारख्या वाळवंटी राज्यात आम्ही काँक्रीटो ग्रीन सादर केले आहे.''