या आठवड्यात दोन IPO भरू शकतात तुमची तिजोरी

IPO
IPOSakal media

या वर्षी आयपीओ मार्केट सातत्याने वधारत आहे. दशकातील सर्वाधिक आयपीओ यावर्षी येत आहेत. विक्रमी संख्येमुळे आयपीओ निधी उभारणीच्या बाबतीत विक्रम मोडत आहेत. या आठवड्यातही दोन आयपीओ खुले होतील.

प्रथम, Nykaa चा IPO 28 ऑक्टोबरला उघडणार आहे. दुसरा आयपीओ फिनो पेमेंट बँकेचा असेल. तो 29 ऑक्टोबरला बाजारात येईल. जर तुम्ही देखील IPO मध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल, तर ही चांगली संधी आहे. मात्र,तज्ञ काय म्हणतात, हे आधी जाणून घेणं आवश्यक आहे.

Nykaa चा IPO 28 ऑक्टोबर रोजी उघडेल

FSN ई-कॉमर्स व्हेंचर्सचा IPO म्हणजेच Nykaa येत्या 28 तारखेला उघडणार आहे. नायका कंपनी सौंदर्यप्रसाधने आणि वेलनेस प्रोडक्ट्स ऑनलाइन विकते. 28 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर दरम्यान हा आयपीओ सुरू असणार आहे. कंपनीने यासाठी 1,085-1,125 रुपयांचा प्राइज बँड निश्चित केला आहे. यामध्ये 630 कोटी रुपयांचे नवीन समभाग जारी केले जातील आणि प्रवर्तक आणि विद्यमान भागधारकांकडून चार कोटींपेक्षा जास्त समभागांची ऑफर फॉर सेल (OFS) असेल.

कंपनीला या महिन्याच्या सुरुवातीला बाजार नियामक सेबीकडून IPO साठी परवानगी मिळाली. नवीन रिटेल स्टोअर्स आणि वेअरहाऊस उघडण्याव्यतिरिक्त आयपीओमधील निधीचा वापर कर्ज कमी करण्यासाठी केला जाईल.

फिनो पेमेंट्स बँक लिमिटेडचा IPO 29 ऑक्टोबरला

Fino Payments Bank Ltd चा IPO 29 ऑक्टोबर रोजी उघडेल आणि 2 नोव्हेंबर रोजी बंद होईल. या IPO मध्ये 300 कोटी रुपयांचे नवे भांडवल असेल. यासह, फिनो पेटेक लिमिटेड ऑफर फॉर सेलमध्ये 1.56 कोटी समभागांची विक्री करेल. या स्टॉकचं लिस्टिंग 12 नोव्हेंबर रोजी एक्सचेंजवर होईल. फिनो पेमेंट बँकेत ब्लॅकस्टोन, आयसीआयसीआय ग्रुप, भारत पेट्रोलियम आणि आयएफसी सारख्या मोठ्या गुंतवणूकदारांची भागीदारी आहे.

अॅक्सिस कॅपिटल, सीएलएसए कॅपिटल, आयसीआयसीआय सिक्युरिटीज आणि नोमुरा फायनान्शियल अॅडव्हायझरी आणि सिक्युरिटीज हे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत. या IPO च्या ताज्या इश्युमधून मिळणारे पैसे कंपनीच्या भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी, कंपनीचा टियर 1 भांडवल बेस वाढवण्यासाठी वापरला जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com