‘जीएसटी’ची आतषबाजी; संकलन १.३० लाख कोटींवर

एक जुलै २०१७ रोजी जीएसटी देशभरात लागू करण्यात आला त्यानंतर आतापर्यंतचे हे दुसरे मोठे संकलन आहे.
gst
gstsakal media

नवी दिल्ली : दिवाळीच्या मुहूर्तावर वस्तू व सेवा कराच्या (‘जीएसटी’) संकलनामध्ये भरघोस वाढ झाली आहे. लागोपाठ चौथ्या महिन्यात ‘जीएसटी’चे करसंकलन एक लाख कोटींहून अधिक झाले आहे. ऑक्टोबरमध्ये १.३० लाख कोटी रुपये इतका ‘जीएसटी’ गोळा झाल्याची आकडेवारी केंद्र सरकारने आज जाहीर केली.

gst
Bypolls Election Result: तीन लोकसभा तर 29 विधानसभा जागांचा आज निकाल

एक जुलै २०१७ रोजी जीएसटी देशभरात लागू करण्यात आला त्यानंतर आतापर्यंतचे हे दुसरे मोठे संकलन आहे. ऑक्टोबरमध्ये जीएसटी संकलनात गेल्यावर्षीच्या ऑक्टोबरच्या तुलनेत २४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट झाल्याने बाजारात चैतन्य आले आहे. त्याचा परिणाम शेअर बाजारातही गेल्या महिन्यात दिसून आला होता. सकारात्मक वातावरणामुळे ‘जीएसटी’ संकलन वाढल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

gst
'दोन्ही अनिल शोधून त्यांचे मास्टरमाईंड गाठा'; देशमुखांच्या अटकेनंतर भाजपची प्रतिक्रिया

‘‘ऑक्टोबर २०२१ मध्ये १,३०,१२७ कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले आहे. त्यात ‘सीजीएसटी’ २३,८६१ कोटी रुपये, ‘एसजीएसटी’ ३०,४२१ कोटी आणि ‘आयजीएसटी’ ६७,३६१ कोटी रुपये (३२,९९८ कोटी रुपयांच्या आयात करासह) आणि उपकर ८,४८४ कोटी रुपये (६९९ कोटी रुपयांच्या आयात करासह) यांचा समावेश आहे,’’ अशी माहिती अर्थमंत्रालयाने दिली आहे.

या वर्षी एप्रिलमध्ये ते १,४१,३८४ कोटी रुपये जमा झाले होते. यापूर्वी सप्टेंबरमध्ये जीएसटी संकलन १,१७,०१० कोटी रुपये होते. ऑगस्टमध्ये जीएसटी संकलन १,१२,०२० कोटी रुपये आणि जुलैमध्ये १.१६ लाख कोटी रुपये होते. जूनमध्ये, जीएसटी संकलन एक लाख कोटी रुपयांपेक्षा कमी म्हणजेच ९२,8८४९ कोटी रुपये होते. मे महिन्यात ते ९८,००० कोटी रुपये होते. उत्पादन आणि मागणी ऑक्टोबरमध्ये सात महिन्यांत सर्वात वेगाने वाढल्याचेही मंत्रालयाने म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com