येस बॅंकेला एक कोटीचा दंड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 मार्च 2019

मुंबई - स्वीफ्ट मेसेंजिंग सॉफ्टवेअरच्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी रिझर्व्ह बॅंकेने येस बॅंकेला एक कोटीचा दंड ठोठावला. यासंबंधी येस बॅंकेने शेअर बाजाराला माहिती कळवली आहे. स्वीफ्ट हे जागतिक पातळीवरील मेसेंजर सॉफ्टवेअर असून, यामध्ये नियमांचे पालन न झाल्याने देशात पीएनबी बॅंकेत १४ हजार कोटींचा गैरव्यवहार झाला होता. रिझर्व्ह बॅंकेकडून बॅंकांच्या प्रणालीविषयक मार्गदर्शक तत्त्वांची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे.

स्वीफ्ट नियमावलीसंदर्भात रिझर्व्ह बॅंकेकडून नुकताच कर्नाटका, युनायटेड बॅंक ऑफ इंडिया आणि करुर वैश्‍य बॅंक या तीन बॅंकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. गेल्या आठवड्यात नियमांचे पालन न केल्याप्रकरणी रिझर्व्ह बॅंकेने युनियन बॅंकेवर तीन कोटी, देना बॅंक दोन कोटी आणि आयडीबीआय आणि एसबीआय यांच्यावर प्रत्येकी एक कोटीची दंडात्मक कारवाई केली होती.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one crore rupees fine to yes bank