Income Tax Return : आता येणार एक राष्ट्र एक आयटीआर फॉर्म?

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने (CBDT) सर्व करदात्यांसाठी एकच आयकर रिटर्न (ITR) फॉर्म फॉर्म आणण्याची तयारी सुरू आहे.
ITR
ITRSakal

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने (CBDT) सर्व करदात्यांसाठी एकच आयकर रिटर्न (ITR) फॉर्म फॉर्म आणण्याची तयारी सुरू आहे. सर्व करदात्यांना एक फॉर्म पाठवण्यात आला आहे. 15 डिसेंबरपर्यंत करदात्यांनी त्यामध्ये सूचना पाठवणे अपेक्षित आहे.

सध्या किती प्रकारचे ITR फॉर्म आहेत?

सध्या सात प्रकारचे आयटीआर फॉर्म वापरात आहेत. त्याचा वापर वेगवेगळ्या वर्गवारीसाठी केला जातो. त्याचे प्रकार खाली दिले आहेत.

• ITR फॉर्म 1 :  या फॉर्मला ‘सहज’ फॉर्म म्हणतात. हा फॉर्म लहान आणि मध्यम करदात्यांसाठी आहे. महिन्याचा पगार, घर मालमत्ता/इतर स्रोत (व्याज इ.) यातून मिळणाऱ्या कमाईसह ५० लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या व्यक्तींना सहज फॉर्म भरता येतो.

• ITR-2 हा फॉर्म निवासी मालमत्तेतून उत्पन्न मिळवणाऱ्या लोकांकडून भरला जातो.

• ITR-3 हा फॉर्म अशा लोकांसाठी आहे ज्यांना व्यवसायातून नफा म्हणून उत्पन्न मिळते.

• ITR-4 (सुगम) फॉर्म हा ITR-1 (सहज) प्रमाणेच एक साधा फॉर्म आहे. व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंबे (HUF) आणि व्यवसायातून 50 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या कंपन्यांद्वारे भरला जातो.

• ITR-5 आणि 6 अनुक्रमे मर्यादित दायित्व भागीदारी (Limited Liability Partnerships) आणि व्यवसायांसाठी आहेत.

• ITR-7 ट्रस्ट आणि नफा न कमावणार्या संस्थांद्कडून हा फॉर्म भरला जातो.

ITR
Digital Rupee : क्रिप्टोकरन्सी आणि डिजिटल रुपयामध्ये काय फरक आहे?

मग त्यात कोणता बदल करण्यात येणार आहे?

प्रस्तावानुसार, ट्रस्ट आणि नफा न कमावणार्या संस्था (ITR-7) वगळता सर्व करदाते एक सामान्य ITR फॉर्म वापरू शकतील. यामध्ये आभासी डिजिटल मालमत्तेतून उत्पन्न दाखवण्यासाठी स्वतंत्र भाग तयार केला जाईल. प्रस्तावित फॉर्म ITR-7 वगळता इतर सर्व फॉर्म एकत्रित करून एक समान ITR फॉर्म तयार करण्याचा प्रस्ताव आहे  असे CBDT ने म्हटले आहे.

नांगिया अँडरसन एलएलपीचे भागीदार संदीप झुनझुनवाला यांनी सांगितले की, नवीन आयटीआर फॉर्म जुन्या आयटीआर-1 आणि आयटीआर-4 फॉर्मसह उपलब्ध असेल, परंतु आयटीआर-2, आयटीआर-3, आयटीआर-5 आणि आयटीआर-6 भरणाऱ्या करदात्यांना जुने फॉर्म भरण्याचा पर्याय उपलब्ध नसेल.

करदात्यांना काय फायदा होईल?

प्रस्तावित मसुद्यामध्ये आयटीआर आंतरराष्ट्रीय पद्धतींच्या अनुषंगाने रिटर्न फाइलिंग सिस्टीमवर फेरविचार केला जात आहे. नवीन येणाऱ्या फॉर्मचा उद्देश रिटर्न भरणे सोपे करणे, व्यक्ती आणि गैर-व्यावसायिक करदात्यांना फॉर्म भरण्यासाठी लागणारा वेळ कमी करणे हा आहे. करदात्यांकडून नवीन फॉर्म संबंधातील सूचना आल्यानंतरच करदात्यांना आयकर विभागाद्वारे त्यांना फॉर्म बद्दलची माहिती पाठवण्यात येईल. असे CBDT ने म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com