Digital Rupee : क्रिप्टोकरन्सी आणि डिजिटल रुपयामध्ये काय फरक आहे?

डिजिटल रुपया चलनात आल्यानंतर तुम्हाला त्याचा काय फायदा होईल?
Digital Rupee
Digital Rupee sakal

क्रिप्टोकरन्सीशी स्पर्धा करण्यासाठी भारतात प्रथमच डिजिटल चलन आणले आहे. 1 नोव्हेंबर पासून डिजिटल रुपी म्हणजेच सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) प्रोजेक्ट म्हणून सुरू करण्यात आला आहे. सध्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) सुरुवातीचा काही काळ त्यातील आव्हाने काय आहेत हे तपासण्याचा प्रयत्न  करेल. पूर्ण खात्री झाल्यानंतरच डिजिटल रुपीचा वापर सुरू केला जाईल.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) डिजिटल रुपीचा वापर घाऊक व्यवहारांसाठी सुरु केला आहे आणि त्याला होलसेल सेगमेंट पायलट प्रोजेक्ट असे नाव दिले आहे. मात्र या व्यवहारांमध्ये समस्या निर्माण झाल्या नाही तर येणाऱ्या काळात सर्वसामान्य नागरिकही डिजिटल रुपयाचा वापर करतील. अशा परिस्थितीत, डिजिटल चलन आणि क्रिप्टोकरन्सीमध्ये काय फरक आहे आणि त्याचा सामान्य लोकांना कसा फायदा होईल हे समजून घेणे फार महत्वाचे आहे.

Digital Rupee
Gold Rate: खरेदी करण्यासाठी सुवर्णसंधी! सोन्या-चांदीचे दर घसरले, जाणून घ्या आजचे दर

क्रिप्टोकरन्सी :

ही विकेंद्रित स्वरूपातील डिजिटल मालमत्ता आहे. याद्वारे कोणतेही व्यवहार डिजिटल पद्धतीने करता येणार आहेत. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाद्वारे क्रिप्टोकरन्सी वेगवेगळ्या पद्धतीने साठवल्या जातात. ब्लॉकचेन हे असे तंत्रज्ञान आहे जिथे डिजिटल चलन तयार करण्याव्यतिरिक्त कोणतीही वस्तू डिजिटल बनवता येते आणि त्याची नोंद ठेवता येते. हा एक प्रकारचा डिजिटल लेसर आहे. परंतु चिंतेची बाब म्हणजे क्रिप्टोकरन्सीचे नियमन करणारी कोणतीही बँक किंवा अन्य संस्था नाही किंवा ती कोणत्याही सरकारद्वारे नियंत्रित केली जात नाही. तसेच हे पूर्णपणे खाजगी चलन आहे. याशिवाय क्रिप्टोकरन्सीच्या दरात चढ-उताराची स्थिती कायम निर्माण होत असते.

डिजिटल रुपया :

डिजिटल रुपीच्या चलनातून होणारे व्यवहारही क्रिप्टोकरन्सीसारख्या डिजिटल माध्यमातून केले जातील. परंतु सर्वात मोठा फरक म्हणजे डिजिटल रुपी पूर्णपणे नियंत्रित असेल, असे सरकारने मंजूर केले आहे. रुपी ही पूर्णपणे सरकार नियंत्रित कायदेशीर चलन आहे. यामध्ये आरबीआय नियामक म्हणून असेल आणि इतर बँका व्यवहारात मदत करण्यासाठी आरबीआय सोबत असतील. व्यवहारांमध्ये कोणतीही अडचण आल्यास वित्तीय संस्था हस्तक्षेप करू शकतात. पण क्रिप्टोकरन्सीमध्ये हे शक्य नाही. हे यूपीआय (UPI)  पेमेंट आणि पेमेंट वॉलेटद्वारे केलेल्या डिजिटल पेमेंटपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. डिजिटल रुपीमध्ये क्रिप्टोकरन्सीसारखे चढ-उतार होणार नाहीत. रोख चलनाप्रमाणेच डिजिटल रुपीचा वापर केलाजाईल. याशिवाय यामध्ये डिजिटल चलनाचे रोख स्वरुपात  रूपांतर करता येते.

Digital Rupee
आरबीआयची डिजिटल करन्सी मोठ्या बँकांसाठी वापर सुरू

डिजिटल रुपयाचे फायदे :

• सामान्य माणसासाठी डिजिटल रुपया सुरू केला, तर तुमच्याकडे रोख ठेवण्याची गरज कमी होईल किंवा त्याची अजिबात गरज पडणार नाही.

• हे मोबाईल वॉलेटमध्ये सहज ठेवता येते. तुम्ही कुठेही डिजिटल रुपया वापरू शकता. ज्याप्रमाणे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि ऑनलाइन पेमेंट सर्वत्र स्वीकारले जाते. त्याचप्रमाणे डिजिटल चलन देखील स्वीकारले जाऊ शकते.

• बनावट नोटांच्या समस्येपासून सुटका होईल. कागदी नोटा छापण्याचा खर्च वाचेल. याशिवाय, अधिकृत नेटवर्कमध्ये होणारे सर्व व्यवहार सरकारच्या देखरेखीखाली असतील.

• ज्या प्रकारे नोटा जुन्या होतात, खराब होतात किंवा फाटल्या जातात अशी कोणतीही समस्या  डिजिटल चलनात येणार नाही.

• त्याच्या वापरामुळे कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन मिळेल आणि यामुळे बँकिंग क्षेत्रात सकारात्मक बदल होईल. डिजिटल रुपयामध्ये अशी व्यवस्था असेल की, इंटरनेटशिवाय देखील पेमेंट करता येईल.

• सध्याच्या चलनी नोटांची जी व्यवस्था अस्तित्वात आहे ती बंद करण्यासाठी डिजिटल रुपया आणला जाणार नाही. तर तो लोकांना नवीन पर्याय देण्यासाठी असेल. ज्यांना डिजिटल व्यवहार करण्यात अडचण येत आहे, त्यांना डिजिटल रूपयांचे रोखीत रूपांतर करण्याची सुविधा यात मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com