'वन प्लस' स्मार्टफोन नाही तर आता लाँच करणार ... 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019

स्मार्टफोनसाठी लोकप्रिय असलेला 'वन प्लस' आता बाजारात नवीन टीव्ही आणणार आहे.

नवी दिल्ली: स्मार्टफोनसाठी लोकप्रिय असलेला 'वन प्लस' आता बाजारात नवीन टीव्ही आणणार आहे. 'वन प्लस टीव्ही' अशा नावाने हा टीव्ही बाजारात आणणार असून एका पोस्टच्या माध्यमातून कंपनीने ही माहिती दिली आहे. टीव्हीच्या ऑफिशियल लोगोचाही कंपनीने खुलासा केला असून या लोगोमध्ये वन प्लस (1+) समोर टीव्ही लिहिलेले असेल. हा टीव्ही पुढील महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये किंवा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लाँच होण्याची शक्यता आहे. 

वन प्लसच्या नवीन टीव्हीचे नाव काय ठेवावे याबाबत बरेच खल करण्यात आले होते . मात्र दुसऱ्या कोणत्याही नावापेक्षा आमच्या कंपनीचे नाव जास्त चांगल्याप्रकारे आमच्या ब्रॅण्डचे आणि दर्जाचे प्रतिनिधित्व करेल यासाठी वन प्लस टीव्ही असे नाव ठेवण्यात आल्याचेही कंपनीने या पोस्टमध्ये सांगितले आहे. नावासाठी कंपनीने स्पर्धाही घेतली होती.

'वन प्लस'च्या टीव्हीमध्ये अँड्रॉइड-आधारित सॉफ्टवेअर असणार आहे. म्हणजेच हा Android टीव्ही असणार आहे. याचबरोबर ओएलईडी स्क्रीन असून 75 इंच आणि 55 इंच अशा दोन प्रकारात ओईएलईडी पॅनेलसह उपलब्ध करण्यात येणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: OnePlus TV launch soon