esakal | पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार; OPEC+ देशांनी घेतला मोठा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

petrol prices

पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार; OPEC+ देशांनी घेतला मोठा निर्णय

sakal_logo
By
नामदेव कुंभार

दोन महिन्यापासून पेट्रोल आणि डिझेलमध्ये सातत्याने वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. पेट्रोलने प्रति लीटर शंभरी ओलांडली आहे तर डिझेलचीही वाटचाल शंभर रुपयांकडे सुरु आहे. या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांना चांगलाच फटका बसत आहे. मात्र, OPEC+ या देशांनी घेतलेल्या महत्वाच्या निर्णायामुळे पुढील महिन्यापासू पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, OPEC+ देशातील मंत्र्यांनी रविवारी इंधन पुरवठा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

OPEC आणि त्यांच्या सहकारी देशांनी म्हणजेच साऊदी अरब आणि संयुक्त अरब अमिरात (UAE) यांच्यामधील मतभेद कमी करण्यासाठी मे 2022 पासून नवीन प्रॉडक्शन वाटप करण्यावर सहमती दर्शवली आहे. त्यामुळेच पुढील काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये घट होऊ शकते. कोरोना संकटानंतर आता जागतिक अर्थव्यवस्थेत झपाट्याने सुधारणा होताना दिसत आहे. यामुळे तेलाची मागणीही वाढली आहे. या धर्तीवर OPEC+ देशांनी महत्वचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा: कोणी कोणाशीही हातमिळवणी केली तरी शिवसेना सक्षमच!

OPEC+ देश मिळून ऑगस्ट महिन्यापासून जवळपास चार लाख बॅरल कच्च्या तेलाचं उत्पादन वाढवणार आहेत. याबाबतचा निर्णय रविवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. आजच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात दिवसाला 8 लाख बॅरल एवढे उत्पादन वाढेल. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या कच्च्या तेलाची किंमत मागील अडीच वर्षांच्या तुलनेत सर्वोच्च स्थरावर पोहोचली आहे. या आठवड्यात कच्च्या तेलाची किंमत 73.14 डॉलर प्रति बॅरल इतकी होती. तर जुलै महिन्यात हा दर 78 डॉलरपर्यंत पोहोचला होता. गेल्या तीन महिन्यात सातत्याने झालेल्या वाढीनंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत या महिन्यात साधारणपणे दोन टक्क्यांनी घसरण पाहायला मिळाली आहे.

हेही वाचा: पवार-मोदी भेटीमुळे काँग्रेस बॅकफूटवर; नव्या समीकरणाची चर्चा

OPEC+ देशांनी गेल्यावर्षी आपल्या उत्पादनात कपात केली होती. गेल्यावर्षी 10 मिलिअन डॉलर प्रति दिवस उत्पादनात कपात करण्यात आली होती. यानंतर यात हळूहळू वाढही करण्यात आली. मात्र, अद्यापही यात रोज 5.8 मिलियन बॅरलची कपात दिसत आहे. कोरोना महामारीमुळे जगभरातील विविध देशांत लॉकडाउन लावण्यात आला होता. त्यामुळे मागणी घटली होती. त्यामुळे OPEC+ देशांनी उत्पादनामध्ये कपात केली होती. मात्र, आता पुन्हा एकदा व्यवहार सुरळीत होत आहेत. त्यामुळेच उत्पादनातही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. OPEC+ ने आपल्या वक्तव्यात सांगितले की, ऑगस्ट 2021 पासून आपल्या उत्पादनात वाढ करण्यात येणार आहे. ऑगस्टपासून डिसेंबर 2021 पर्यंत दोन मिलियन बीपीडी किंवा 0.4 मिलियन बीपीडी प्रति महिना पुरवठा केला जाऊ शकतो.

loading image