esakal | आता एटीएममधून पैसे काढतानाही लागणार OTP
sakal

बोलून बातमी शोधा

ATM

- 10 हजारांपेक्षा अधिकच्या रकमेसाठी OTP

- SBI च्याच एटीएमवर मिळणार ही सुविधा

आता एटीएममधून पैसे काढतानाही लागणार OTP

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : सध्या बँक गैरव्यवहार प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. एटीएम किंवा इतरही काही माध्यमातून बँक खातेदाराला आर्थिक धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळेच आता बँकेकडून त्यादृष्टीने विशेष खबरदारी घेतली जात आहे. त्यानुसार आता देशातील सर्वांत मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने आपल्या खातेदाराला बँकेतून रक्कम काढण्यासाठी 'वन टाईम पासवर्ड' (OTP) गरजेचा केला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

स्टेट बँकेत खाते असलेल्या खातेदाराची आर्थिक फसवणूक होऊ नये, यासाठी बँकेकडून हे पाऊल उचलले जात आहे. एसबीआयकडून हे नवे नियम 1 जानेवारी, 2020 पासूनच लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार 8 रात्रीपासून सकाळी 8 पासून एसबीआयच्या एटीएममधून रक्कम काढायची असल्यास OTP ची आवश्यकता असणार आहे. यापूर्वीही हा नियम लागू करताना बँकेकडून याबाबतची माहिती खातेदारांना दिली होती. मात्र, आर्थिक फसवणुकीपासून वाचावे, यासाठी आता पुन्हा एकदा बँकेने ट्विट करून ही माहिती दिली आहे.

10 हजारांपेक्षा अधिकच्या रकमेसाठी OTP

एसबीआयच्या OTP च्या आधारे असणाऱ्या विड्रॉवल सुविधेनुसार एसबीआयच्या ग्राहकाला रात्री 8 पासून ते सकाळी 8 वाजेपर्यंत 10 हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम एटीएममधून काढायची असल्यास OTP ची गरज लागणार आहे. OTP विना संबंधित खातेदार 10 हजार किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम काढू शकणार नाहीत. 

SBI च्याच एटीएमवर मिळणार ही सुविधा

याबाबत एसबीआयने सांगितले, की रक्कम काढण्याची ही सुविधा फक्त एसबीआयच्या एटीएमवरच उपलब्ध असणार आहे. तसेच जो खातेदार एसबीआयच्या एटीएमशिवाय इतर एटीएममधून पैसे काढत असेल त्याला OTP पाठवला जाणार नाही. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा