मजुराची तीन वर्षांची कमाई मुकेश अंबानी कमावतात अवघ्या सेकंदात

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 25 January 2021

भारतामध्ये वाढत जाणारी आर्थिक असमानता एक कडवं सत्य आहे.

नवी दिल्ली- कोरोना महामारीने जगासह देशभरात धुमाकूळ घातला आहे. आता कुठे देशातील परिस्थिती आटोक्यात येताना देसत आहे. असे असले तरी कोरोना विषाणूमुळे भारतात अब्जाधीश आणि कोट्यवधी बेरोजगार, अकुशल मजूर, गरीब पुरुष आणि महिला यांच्यातील उत्पन्नाच्या असमानतेची दरी आणखी रुंदावली आहे. नॉन प्रॉफिट ग्रुप Oxfam ने सोमवारी यासंबंधी एक रिपोर्ट सादर केला आहे. 

'Worst President Ever'; ट्रम्प यांच्या घरावरुन फिरताहेत ट्रोल करणारी...

The Inequality Virus या शिर्षकाखाली सादर करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय की, कोरोना महामारीमुळे लादण्यात आलेल्या लॉकडाऊनदरम्यान भारतातील अब्जाधीशांच्या संपत्तीत 35 टक्क्यांनी वाढ झाली आहे, दुसरीकडे देशातील 84 टक्के कुटुंबीयांना आर्थिक समस्येला सामोरे जावे लागले. एकट्या एप्रिलमध्ये प्रत्येक तासाला 1.7 लाख लोकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. 

रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय की, मार्च 2020 मध्ये भारतातील 100 अब्जाधिशांनी जितकी जंपत्ती कमावली आहे, तितक्या संपत्तीमध्ये देशातील 13.8 कोटी गरीब लोकांना 94,045 रुपयांचा चेक दिला जाऊ शकतो. Oxfam ने दिलेल्या रिपोर्टममुळे गरीब आणि श्रीमंतांमधील दरी आणखी वाढत असल्याचं स्पष्ट होत आहे. गरीब आणखी गरीब होताना दिसत आहेत, तर श्रीमंत अधिक श्रीमंत होताना दिसत आहेत. 

भारतात आणखी एका लशीची होणार एन्ट्री; टाटा ग्रुपने सुरु केली तयारी

रिपोर्टमध्ये म्हणण्यात आलंय की, भारतामध्ये वाढत जाणारी आर्थिक असमानता एक कडवं सत्य आहे. कोरोना महामारीच्या काळात रिलायन्स इंडस्ट्रिजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी एका तासात जितकी संपत्ती कमावली, तितकी संपत्ती कमवण्यासाठी देशातील अकुशल मजुराला 10,000 वर्षे लागतील. एका सेकंदात मुकेश अंबानी यांनी जितकी संपत्ती कमावली, तेवढं कमवण्यासाठी 3 वर्षे लागतील. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यातच मुकेश अंबानी जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती झाले आहेत. 

कोरोना महामारीमुळे अचानक लादण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे प्रचंड हाल झाले. लॉकडाऊनमध्ये लाखो प्रवासी मजुरांनी आपला रोजगार गमावला, त्यांना कामाची जागा सोडून आपल्या घराकडे स्थलांतर करावं लागलं. लाखो मजुरांनी मिळेल त्या वाहनांनी किंवा पायी आपल्या घराची वाट धरली. या काळातील हृदयाला पीळ पाडणारे फोटो समोर आले होते. मजुरांनी अक्षरश: शेकडो किलोमीटर अंतर पायी चालून पार केलं. यादरम्यान शेकडो लोकांनी आपला जीव गमावला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Oxfam report on india Inequality Virus lockdown mukesh ambani