मोदींच्या गुजरातमध्ये पाकिस्तानी शिष्टमंडळ येणार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

नवी दिल्ली: वायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेमध्ये यंदा पाकिस्तानचे व्यावसायिक शिष्टमंडळ सहभागी होणार आहे. पाच वर्षांनंतर प्रथमच पाकिस्तानी  व्यावसायिक शिष्टमंडळ वायब्रंट गुजरात समिटमध्ये सहभागी होणार आहे. नवीन वर्षात 18 ते 20 जानेवारी 2019 दरम्यान वायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषद पार पडणार आहे. 

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या विविध भागातील सात शिष्टमंडळे या परिषदेमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. 2013 नंतर प्रथमच पाकिस्तानातील व्यावसायिकांचे शिष्टमंडळ या परिषदेमध्ये दिसणार आहे. 2013 मध्ये कराची चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे 22 सदस्यांचे शिष्टमंडळ वायब्रंट गुजरात समिटमध्ये सहभागी झाले होते. पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना वायब्रंट गुजरात समिटला सुरुवात केली होती. मात्र त्यावेळी सीमेवर जम्मू-काश्मीरच्या मेंढर सेक्टरमध्ये शस्त्रसंधीच्या उल्लंघनात दोन भारतीय जवान शहीद झाल्यानंतर दोन्ही देशांमध्ये पुन्हा तणाव वाढला होता. परिणामी मुख्य परिषदेआधीच  शिष्टमंडळ पाकिस्तानात निघून गेले होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan delegations likely to attend Gujarat investors’ event